- आरोग्य

चेहऱ्यावरील डेड स्कीन घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

धूळ, प्रदूषण, ताण-तणाव याचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत असतो. धूळ, प्रदूषण, ताण-तणाव यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. त्वचेवर खाज येते. इन्फोमराठीच्या या लेखात आज आपण चेहऱ्यावरील डेड स्कीन घालवण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

चेहऱ्यावरील डेड स्कीन घालवण्यासाठी संत्र्याची साल सावलीत सुकवून घ्या. सुकल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. आता 2 चमचे संत्र्याच्या सालीची पावडर एका छोट्या वाटीत घ्या त्यामध्ये थोडेसे गुलाब पाणी मिसळा.

हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने आपला चेहरा चोळा. 5 मिनीटे असे करा. त्या नंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून 2 वेळा असे करा.

चेहऱ्यावरील डेड स्कीन घालवण्यासाठी एक चमचा साखरमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. 5 मिनीटे असे करा. आणि नंतर आपले तोंड थंड पाण्याने धुऊन घ्या.

मधात साखर मिसळून लावल्याने आपल्या त्वचेला आर्द्रता येते. आणि चेहऱ्यावरील डेड स्कीन निघायला मदत मिळते. आठवड्यातून दोनदा असे केल्याने चेहऱ्यावर चमक येईल.हे मिश्रण आपण हात, पायांसाठी देखील वापरू शकता.

सफरचंद व्हिनेगर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील डेड स्कीन काढून टाकण्यासाठी एक चमचा सफरचंद व्हिनेगर सफरचंद व्हिनेगरमध्ये थोडेसे पाणी घाला. आणि चांगले मिसळून घ्या.

नंतर कापसाच्या मदतीने हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 नंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. आठवड्यातून एकदा असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील डेड स्कीन जाऊन आपला चेहरा चमकदार होईल.

चेहऱ्यावरील डेड स्कीन काढून टाकण्यासाठी आपण हा सोपा उपाय नक्की करू शकता यासाठी सर्वप्रथम संत्र्याची साल सुकवून घ्या. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून थोड्याश्या दुधामध्ये मिसळून पेस्ट तयार करा.

हि पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. त्यानंतर प्रभावित भागावर हाताने चोळा. असे केल्याने आपण त्वचेवरील डेड स्कीन सहजपणे काढून टाकू शकता.

चेहऱ्यावरील डेड स्कीन काढून टाकण्यासाठी आपण बेकिंग सोडा देखील वापरू शकता. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडेसे पाणी घ्या.

त्यानंतर एका वाटीमध्ये बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल कापून त्यातील व्हिटॅमिन ई मिसळा. त्यानंतर थोडेसे पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा.

हलक्या हाताने मसाज करा. 5 मिनीटे असे करा. आणि नंतर आपले तोंड थंड पाण्याने धुऊन घ्या. बेकिंग सोडयाच्या मदतीने आपण त्वचेवरील डेड स्कीन सहजपणे काढून टाकू शकता. आपण हे मिश्रण ओठांसाठी  देखील वापरू शकता.

आपल्याला चेहऱ्यावरील डेड स्कीन घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: इंडिया.कॉम आणि स्टाईलक्रेझ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *