- आरोग्य

शरीरात हिमोग्लोबीनची कमी कशी ओळखाल?

हिमोग्लोबीन हा शरीरातील सर्वांत महत्वाचा घटक आहे. रक्त कोशिकांमध्ये उपलब्ध असलेले लोहयुक्त प्रोटिन म्हणजे हिमोग्लोबीन. शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हे प्रोटिन करतात.

हिमोग्लोबीनमध्ये हेम अर्थात लोह आणि ग्लोबिन प्रथिने असतात आणि जेव्हा आहारात लोहाची कमतरता येते तेव्हा शरीरात हिमोग्लोबीनची पातळी देखील कमी होऊ लागते.

हिमोग्लोबिनचे प्रमाण  कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. जेव्हा शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता येते तेव्हा थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, चिडचिड, चक्कर येणे, श्वास लागणे, चिंताग्रस्त होणे आणि हात पाय सूजणे यासारखे लक्षणे दिसू लागतात.

हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्वचेचा मुळ रंग बदलतो. त्वचा पांढरट दिसू लागते. ह्रदयाला पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्यास ह्रदयाचे ठोके प्रमाणापेक्षा वाढतात नाहीतर प्रमाणापेक्षा कमी होतात. ज्यामुळे भिती वाटणे, छातीत धडधडणे असे प्रकार सुरु होतात.

हिमोग्लोबीनचा अभाव शरीरात लाल रक्त पेशी कमी प्रमाणात तयार होण्यास, लाल रक्तपेशींच्या उत्पादनांच्या तुलनेत जास्त प्रमाणात लाल रक्त पेशी कमी होणे, शरीरातील रक्त कमी होणे इत्यादी समस्या निर्माण करते.

हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा उद्भवतो. या अवस्थेला अशक्तपणा म्हणतात. अशक्तपणा हा काही आजार नाही, परंतु तो निश्चितपणे बऱ्याच आजारांचे कारण बनतो.

विशेषत: गर्भधारणेदरम्यान स्त्रियांमध्ये अशक्तपणा अधिक दिसून येतो. कारण यावेळी शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. रक्तामध्ये लोहाची मात्रा कमी झाल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढतो.

हिमोग्लोबिनचे शरीरातील प्रमाण: पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची योग्य मात्रा १४ ते १८ ग्रॅम / १०० मिली असते. तर स्त्रियांमध्ये ही मात्रा १३ ते १५ ग्रॅम / १०० मिली इतकी असते. लहान मुलांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सुमारे १४ ते २० ग्रॅम / १०० मिली इतकी असते.

शरीरात हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय: शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर आपल्या आहारात बीटाचा समावेश करा.

कारण बीटामध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम हे सर्व योग्य प्रमाणात असते.पालक, राई, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर हे आपल्या आहारामध्ये समावेश करा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन आणि सकाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *