- इन्फोमराठी

घरातील ढेकूण दुर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय

ढेकूण हा अतिशय चिवट प्रजातीचे कीटक आहे. एकदा का घरात शिरला  की त्यांची फौज तयार होण्यास वेळ लागत नाही. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते मग ते लवकर बाहेर निघण्यासही तयार होत नाहीत.

ढेकूण विशेषतः रात्रीच्या वेळी चावतात. चावल्यानंतर त्या जागेवर त्वचा विकार होण्याची शक्यता असते. यासाठी उपाय म्हणून अनेकदा औषध फवारणी, पेस्ट कंट्रोल करून घ्यावे लागते.

अशी औषधे आरोग्याला अपायकारक असल्याने त्याचा वापर हि जपून करावा लागतो. आज आपण जाणून घेणार आहोत घरातील ढेकूण दुर करण्यासाठी घरगुती उपाय

ढेकणांसाठी पुदिना एक चांगला उपाय आहे. पुदिन्याचा वास ढेकणांना सहन होत नाही. त्यासाठी पुदिन्याचा रस अंगाला लावल्यास ढेकूण लांब रहातात. तसेच घरात लहान मुले असतील त्यांच्या जवळ रात्रीच्या वेळी पुदिन्याची पाने पसरून ठेवावीत. असे केल्याने रात्रीच्या वेळी ढेकूण लांब रहातात.

कडुलिंबाची पाने जंतूंरोधक असतात. यातील अँटी मायक्रोबायल ही घरातील कीटकांच्या त्रासाला कमी करण्यास मदत करते. कडुलिंबाची पाने चुरून पाण्यात मिसळून याचा स्प्रे बॉटल च्या सहाय्याने घराच्या कोपऱ्यात मारू शकता. ढेकणांची प्रजनन क्षमता चांगली असल्याने याचा आठवड्यातून दोन तीन वेळा प्रयोग करायला हरकत नाही.

घरात ढेकुण झाले असतील तर त्यावर कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे मारा. याने आठवड्याभरात फरक दिसायला सुरवात होईल. तसेच कपडे धुताना डिटर्जंट पावडर बरोबर या तेलाचाही वापर केल्यास कापड्यांपासून ते लांब रहातात. कडूलिंबाच्या पानांसोबत कडुलिंबाचे तेल देखील ढेकणांचा त्रास कमी करण्यास मदत करतो.

कांद्याचा रस हा ढेकणांना मारण्यास जालीम औषध आहे. याने त्यांची श्वसनक्रिया बंद पडते व ते लवकर मरतात. निलगिरीचा वास ढेकणांना लांब ठेवण्यास मदत करतो. ढेकूण दिसल्यास त्यावर हे तेलाचे काही थेंब शिंपडा.

आपल्या बिछान्यात ढेकुण होऊ द्यायचे नसतील दर काही दिवसांनी आपण व्हॅक्यूम क्लीनरने आपला बिछाना, गाद्या, उश्या साफ करत जा. व्हॅक्यूम क्लीनरने  सफाई केल्याने बिछान्यात ढेकुण असतील तर ते निघून जातील.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: स्लिप ऍडवायझर डॉट ऑर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *