- आरोग्य

अंगावर खाज येत असल्यास करा हे घरगुती उपाय

शरीरावर खाज येणे त्रासदायक असत. शरीरावर खाज येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. वेळेवर आंघोळ न करणे, त्वचेवर धूळ – माती जमणं, दूषित पाणी,  किडे चावल्याने, एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने या किंवा इतर काही कारणांमुळे खाज येत असल्यास आपण खाली दिलेल्या काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

शरीराला खाज येत असल्यास सर्वात सोपा उपाय म्हणजे कडुलिंबाची काही पाने पाण्यामध्ये उकळवून तुम्ही त्या पाण्याने आंघोळ केल्यास, अंगावरील खाज कमी होते. बहुतांशी वेळा निघून जाते.

अंगावर पुरळ आले असल्यास हि कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने पुरळ नाहीसे होतील. शरीराला खाज येत असल्यास तुळशीच्या पानांचा रस कापसाने खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यास खाज येणे बंद होईल.

खाज येत असल्यास त्यावर कोरफडाचा गर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल. कोरफडाचा गर त्वचेला थंडावा देण्याचे कार्य करतो.

ज्यांना शरीराला खाज सुटण्याची समस्या आहे, त्यांनी प्रथम आंघोळीच्या पाण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कधीकधी दूषित पाणी देखील खाज सुटण्याचे कारण असू शकते. आपण आंघोळ करत असलेले पाणी शुद्ध असल्याची खात्री करून घ्या.

शरीराला खाज येत असल्यास मुठभर तुळशीची पाने पाण्यात उकळवून त्या पाण्याने आंघोळ करा. तुळशीच्या पानांमधील औषधी गुणधर्मामुळे आपल्या अंगाला येणारी खाज थांबते.

खाज येत असल्यास थोडेसे मेथीचे दाणे भिजवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. हे मिश्रण खाज येत असलेल्या ठिकाणी लावा. साधारणपणे 15 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

आपल्याला फरक जाणवेल. खाज येण्यामुळे त्वचा कोरडी पडली असल्यास त्यावर आपण कोरफडाचा गर अथवा कोरफड जेल लावू शकता.

आपल्याला आंघोळीच्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. पाण्यात चांगले मिसळा आणि त्यानंतर या पाण्याने अंघोळ करा. असे केल्याने अंगावरील खाज कमी होण्यास मदत मिळेल. खाज येत असल्यास त्या भागावर नारळाच्या तेलाने मालिश करा असे केल्याने लवकर आराम मिळेल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *