चांगले केस हे फक्त आपल्या सौंदर्याचे लक्षण नसून आपल्या आरोग्याचे प्रतीक आहे याची जाणीव आपल्याला सतत असणे अतिशय आवश्यक आहे. डोक्यावरची त्वचा सतत ओलसर राहिली तर त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊन त्यामुळे केसात कोंडा होतो.
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते यामुळे बरेचदा केसामध्ये कोंडा होतो. तर आज जाणुन घेउयात केसात कोंडा कशामुळे होतो?
कोंडा कशामुळे होतो? केस धुण्यासाठी नैसर्गिक शिकेकाई जास्त उपयुक्त ठरते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात कोणतीही केमिकल्स नसतात. डोक्याला तेल लावणे अतिशय आवश्यक आहे. आवळा, खोबरेल तेल, ब्राम्ही अशी केशवर्धक तेल डोक्यास लावा.
तेल लावताना थोडस कोमट करून लावा. तेल जास्त प्रमाणात न लावता थोडे थोडे डोक्याला हलक्या हाताने चोळून चोळून लावा. अगदी हळुवार मसाज करा. जेणेकरून केसांच्या मुळांना ते तेल व्यवस्थित पोहोचले.
कोंडा असलेल्या केसांसाठी दही हा अतिशय परिणामकारक असा उपाय आहे. यासाठी केसाना दही लावून 15 मिनिट्स ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय जोपर्यंत केसांमधील कोंडा कमी होत नाही तो पर्यंत एक दिवस आड तुम्ही अस करू शकता. दह्यामुळे केसांचे पोषण होते.
केसांमधील कोंडा घालवण्यासाठी हा उपाय सोपा उपाय नक्कीच करता येऊ शकतो यासाठी सर्वप्रथम मुठभर सिताफळाच्या बिया मिक्सरमध्ये बारीक करून एका वाटीत काढून घ्या.
नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून रोज अर्धा तास केसांच्या मुळांशी लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने केसांमधील कोंडा जाण्यारस मदत होईल.
सफरचंदाचा रस आणि पाणी समान प्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण केसांना १५ मिनीट लावा आणि थोड्या वेळाने धुवून टाका. यामुळे कोंडा जाण्यास मदत होईल.
कोरफडीची पानं तोडून चमच्याने त्याचा गर काढा व हाताने डोक्याच्या त्वचेवर ह्या गराने मसाज करा. 30 मिनिटे असेच केसांवर राहू दया, मग केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. असं केल्याने केसांना पोषण तर मिळतेच परंतु केसांतील आर्द्रतेचा अंश देखील नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे कोंडा जाण्यास मदत होईल.
केसांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचा वापर करू शकता आणि साधारण 5 मिनिट्स हे तेल डोक्यावर लावून सुकू द्यावं. त्यानंतर केस धुऊन टाका. यामुळे कोंडा जाण्यास मदत होईल.
संत्र्याच्या सालीची पेस्ट करून त्यात ४-५ चमचे लिंबाचा रस मिक्स करा. आणि हे मिश्रण अर्धातास डोक्याला लावून ठेवा. आणि धुवून टाका. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केल्यास केसांतील कोंडा नाहिसा होईल.
लिंबाचा रस लावल्याने कोंडा होत नाही. तीन चमचे लिंबू रसाने तुमच्या केसांची मसाज करा आणि त्यानंतर पाण्याने केस धुऊन टाका. यामुळे कोंडा जाण्यास मदत होईल.
आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: प्रसिद्ध फार्मइजी ब्लॉग