- आरोग्य

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

अंडरआर्मची त्वचा मऊ आणि मुलायम असते. हेअर रिमूव्हल क्रीमच्या अति वापर, घट्ट कपडे वापरणे, डिओड्रंटच्या वापरामुळेही अंडर आर्म काळे पडतात. आज आपण जाणून घेणार आहोत अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या बटाटाचे तुकडे घेऊन अंडरआर्मवर हलक्या हाताने घासू शकता. आपल्याला लवकरच त्याचा परिणाम दिसेल.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसात एक चमचा गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण आपल्या अंडरआर्मसवर चांगले लावा आणि रात्रभर तसेच  ठेवा. सकाळी अंडरआर्म कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने अंडरआर्मचा काळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

अंडरआर्मचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट अंडरआर्मवर 15 मिनिटे  लावून ठेवा. असे केल्याने अंडरआर्मचा काळपटपणा दूर होईल.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी बदाम तेलाने अंडर आर्ममध्ये हलक्या हातानं मसाज करा. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस अत्यंत प्रभावी मार्गाने कार्य करतो. याचा वापर करण्यासाठी, आपण दररोज आंघोळ करण्यापूर्वी दोन मिनिटांसाठी अंडरआर्ममध्ये लिंबाचा रस लावा. आणि हलक्या हाताने चोळा असे केल्याने अंडरआर्मचा काळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी अंडरआर्मवर फक्त पंधरा मिनिटे कोरफडाच्या गराने मालिश करा. त्यानंतर आपले अंडरआर्म स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. कोरफड आपल्या त्वचेवर एक नैसर्गिक एक्झोलीएटर म्हणून कार्य करते आणि मृत त्वचा बाहेर काढते. ज्यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी संत्राच्या साली सुकवून त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवा. एका वाटीमध्ये 2 चमचे हि पावडर घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिसळून घ्या हाताने चांगले मिश्रण बनवून घ्या.

त्यानंतर हे मिश्रण आपल्या अंडरआर्मवर लावा. हलक्या हाताने चोळा. 15 मिनिट राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्याने आपल्याला चांगले परिणाम दिसू शकतील.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा दुधात आणि हळद मिसळून पेस्ट बनवा. याने अंडरआर्मवर मालिश करा. काही दिवसातच आपल्याला फरक दिसेल.

दुधामध्ये लॅक्टिक अयसिड असते. ज्यामुळे अंडरआर्मचा काळेपणा दूर होण्यास मदत मिळते. हळद आणि दुध यांच्या मिश्रणामुळे रंग उजळतो. त्यामुळे अंडरआर्मवरील काळपटपणा जाऊन रंग उजळेल.

आपल्याला अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. Ref: Health Line

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *