- आरोग्य

प्रवासामध्ये उलट्यांचा त्रास होऊ नये यासाठी घरगुती उपाय

प्रवास करणे सगळ्याचं आवडत. प्रवासामुळे वेगवेगळी ठिकाणे पाहता येतात. परंतु प्रवासात मळमळण्याचा,उलटीचा त्रास झाल्यास त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं राहून जाते.

बऱ्याचदा यामुळेच प्रवासाला जाणे टाळल जात. ही समस्या सहसा लहान मुले आणि स्त्रियांमध्ये दिसून येते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. प्रवासामध्ये उलट्यांचा त्रास होऊ नये यासाठी घरगुती उपाय

कधीकधी वाहनांच्या डिझेल किंवा पेट्रोलमधून येत असलेल्या वासामुळे आपल्याला होईल असे  वाटत असते. त्यामुळे आपल्याला प्रवासात उलटी किंवा मळमळण्याचा त्रास असल्यास आपण शक्यतो खिडकीच्या बाजूला बसा. जेणेकरून आपल्याला ताजी हवा घेता येईल आणि आपल्याला उलटी किंवा मळमळणार नाही.

प्रवासात उलटी किंवा मळमळत असल्यास पुदीना तेल रूमालावर घ्या. प्रवासादरम्यान ह्या रुमालाचा वास घ्या. पुदिना तेलाच्या वासाने उलटी होणार नाही.

प्रवासाला निघण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच तिखट पदार्थ पचायला अधिक वेळ लागतो. म्हणून प्रवासाला निघण्यापूर्वी तिखट तेलकट पदार्थ खाऊ नका.

प्रवासादरम्यान मळमळ होऊ लागल्यास आणि आपल्याला वाटतय कि आता उलट्या होऊ शकतात, तेव्हा लवंग चघळा. लवंग चघळल्याने उलटी होणार नाही.

प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होत असल्यास आपण प्रवासादरम्यान लिंबू आपल्या बरोबर ठेवा. जेणेकरून  प्रवासात जेव्हा तुम्हाला उलटी येतेय अस वाटेल त्या वेळी लिंबाचा वास घ्या. आपल्याला बरे वाटेल.

प्रवासादरम्यान मळमळ होत असेल तर आपण थोडीशी बडीशेप खाऊ शकता. बडीशेप चावून खाल्लाने मळमळ थांबते. प्रवासाला बाहेर निघण्याआधी आपल्याला सोबत आल्याचा तुकडा घ्या. जेव्हा आपल्याला मळमळल्या सारखे वाटेल तेव्हा थोडासा आल्याचा तुकडा चघळायचा असे केल्याने मळमळणार नाही.

आपल्याला नेहमीच प्रवासात उलटी किंवा मळमळत असल्यास शक्य असल्यास खिडकीच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करा. कारण खिडकी मधून येणाऱ्या हवेमुळे आपल्याला मळमळणार नाही. त्याचबरोबर आपण झोपून हि प्रवास करू शकता.  तसे केल्याने आपल्याला मळमळणार नाही.

आपल्याला प्रवासामध्ये उलट्यांचा त्रास होऊ नये यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *