- आरोग्य

हात पायाना मुंग्या येत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

बराच वेळ बसून किंवा उभे राहिल्यास आपल्या पायांमध्ये मुंग्या आल्यासारखे वाटते का? काही घरगुती उपायांनी बराच काळ हात पायाना मुंग्या येण्याच्या समस्येवर आपण मात करू शकता. चला तर जाणून घेऊयात.

एका टबमध्ये पाणी घ्या आणि त्यात 4 चमचे जाडे मीठ घाला. आता आपले हात व पाय त्या पाण्यात 20 ते 30 मिनिटे बुडवून ठेवा. आपण दररोज हे देखील करू शकता.

हात पायाना  मुंग्या येत असल्यास दही खा.  दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅंगनीज असत, जे रक्ताभिसरण सुधारून आपल्या शरीराच्या नसांचे कार्य सुधारण्यास मदत करत आणि हात पायांना मुंग्या येणे दूर करण्यास मदत मिळते.

हात पायाना मुंग्या येत असल्यास मालिश थेरपी खूप उपयुक्त ठरते. मालिश केल्यास सतत मुंग्या येणे कमी होते. मालिश करण्यामुळे नसा उत्तेजित होतात आणि त्यांचे कार्य सुधारते. यामुळे रक्त परिसंचरण वाढते आणि आपले हात आणि पाय मुंग्या येणे देखील दूर होते.

दालचिनीमध्ये पोटॅशियम आणि मॅंगनीज सारखे घटक असतात, जे आपले रक्त परिसंचरण सुधारण्यास आणि हात, पायांच्या  मुंग्या दूर करण्यास मदत करतात. यासाठी 1 किंवा 2 कप पाणी गरम करा. त्यात 1 चमचा दालचिनी पावडर घाला आणि नंतर हे प्या. असे केल्याने हात पायाना मुंग्या येण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत मिळेल.

याबरोबरच आपल्या आहारात व्हिटॅमिन बी 12 पूरक आहाराचा समावेश करा. आपण मांसाहार करत असल्यास अंडी, मटन, मासे खाल्याने आपल्याला व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *