- आरोग्य

मधमाशीने डंख मारल्यास करा हे घरगुती उपाय

मधमाशीने डंख मारल्यास त्या ठिकाणी सूज येते, तसेच तीव्र वेदना देखील सुरू होतात. ग्रामीण भाग असो की शहरी भाग मधमाशींचे पोळे हे सगळीकडेच आढळतात. उंच उंच इमारतींवर सुद्धा मधमाशा आपले पोळे तयार करतात.

त्यामुळे आपण कुठे हि राहत असले तरीही मधमाश्या आपल्याला डंख मारू शकतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. मधमाशीने डंख मारल्यास आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

मधमाशीने डंख मारल्यास सर्वप्रथम ज्या ठिकाणी डंख मारला आहे त्या ठिकाणी मधमाशीचा काटा आहे का बघून घ्या असल्यास हाताने किंवा छोट्या चिमट्याच्या साहाय्याने तो काढून टाका. असे केल्याने विष पसरणार नाही.

मधमाशीने डंख मारल्यास त्या ठिकाणी मध लावा. मध लावल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते. तसेच मध लावल्याने त्या ठिकाणी सूज येत नाही. मधमाशीने डंख मारल्यास त्या ठिकाणी बर्फाचे तुकडे लावा. बर्फ लावल्याने वेदना कमी होतील.

मधमाशीने डंख मारल्यास त्या जागेवर कोरफडाचा गर लावल्याने सुद्धा वेदना कमी होतात आणि सूज येण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

मधमाशी चावल्यास त्या ठिकाणी बेकिंग सोडा लावा. बेकिंग सोडा अल्कलाइन असल्याने डंखातील मधमाशीच्या विषाचा प्रभाव कमी होतो. बेकिंग सोडा लावल्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात.

मधमाशी चावल्यास त्या ठिकाणी मधमाशीचा काटा काढून टाकल्यानंतर त्यावर कापसावर थोडेसे अॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि मधमाशी चावलेल्या ठिकाणी लावा. असे केल्याने वेदना कमी होतात आणि सूज येण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

आपल्याला मधमाशीने डंख मारल्यास  वेदना कमी होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *