- आरोग्य

सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून पिण्याचे आरोग्यदायी फायदे

आयुर्वेदामध्ये मधाला औषध म्हणून मानले जाते. नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरीरात स्फूर्ती, शक्ती आणि ऊर्जा येते. मधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते.

तसेच केस गळती कमी होण्यास मदत मिळते. मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम असते.  आज आपण जाणून घेणार आहोत कोमट पाण्यात चमचाभर मध मिसळून पिण्याचे आरोग्यदायी फायदे

नियमित रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास उत्साह वाढण्यास मदत होते. तसेच तरतरी येते. मध आपल्याला तात्काळ उत्साही करण्यास मदत करते.

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. तसेच आपले पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत मिळेल. कोमट पाण्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शौचातील कडकपणा दूर होऊन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

स्त्रीयांनी मासिकपाळीच्या दरम्यान कोमट पाण्यात मध मिसळून घेतल्यास मासिकपाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते. कोमट पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास किडनी आणि आतडे चांगले राहण्यास मदत मिळते.

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली होण्यास मदत मिळते. नियमित रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास आपल्या शरीरातील अपायकारक घटक मुत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकण्यास मदत मिळते. पोट साफ राहिल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही.

रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास आपला घसा दुखत असल्यास तसेच खोकला येत असल्यास कोमट पाण्यात मध मिसळून सेवन केल्यास आराम मिळतो.

मधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्याबरोबरच मधामध्ये अमीनो एसिडस्, खनिज आणि जीवनसत्त्वे असतात जे कोलेस्ट्रॉल आणि चरबी शोषण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन वाढण्याचे प्रमाण कमी होते.

चांगल्या परिणामांसाठी रिकाम्या पोटी सकाळी उठल्याबरोबर मध आणि कोमट पाण्याचे मिश्रण प्या. हे आपल्याला उत्साही हि ठेवेल त्याचबरोबर आपले वजन हि कमी होईल.

आपल्याला कोमट पाण्यात मध मिसळून पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणींना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: फेमिना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *