- आरोग्य

केसतोड साठी घरगुती उपाय

जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागावरील केस मुळांपासून निघून येतो. तेव्हा त्या ठिकाणी मुरुमासारखा पिंपल येतो. याला केसतोड अस म्हटल जात. केसतोड झाल्यास त्याठिकाणी प्रचंड वेदना होत असतात. आज आपण केसतोड झाल्यास कोणकोणते आयुर्वेदिक उपाय करून या वेदनातून आराम मिळू शकतो या विषयी जाणून घेणार आहोत.

केसतोडसाठी कोरफड उपयुक्त आहे. केसतोड झालेल्या जागेवर कोरफडाचा गर रात्री झोपण्याआधी लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने केसतोडच्या जागेवर झालेली जखम बरी होण्यास मदत मिळेल.

रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवा आणि केसतोड झालेल्या जागेवर लावा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ धुवा. असे केल्याने केसतोड झालेल्या ठिकाणची खाज कमी होण्यास मदत मिळेल. तसेच जखम लवकर बरी होईल.

केसतोड बरी करण्यासाठी आपण हळदीचा उपयोग करू शकता. हळद हि अँटीबॅक्टरियल असते. ज्यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत मिळते. केसतोड बरी करण्यासाठी 1 चमचा हळद पावडर घ्या. त्यामध्ये किंचित पाणी घालून केसतोड झालेल्या जागेवर त्याचा लेप द्या. असे केल्याने जखम लवकर बरी होईल.

लसणामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. लसणाचा वापर केल्याने फोड बरे होण्यास मदत मिळते. यासाठी लसणाच्या दोन चार पाकळ्या ठेचून त्याचा रस फोड आलेल्या ठिकाणी लावा. 1 तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

केसतोड झालेल्या जागेवर एरंडेल तेल लावल्याने जखम लवकर बरी होऊ शकते. केसतोड झालेल्या जागेवर सूज आलेली असल्यास साधा सुती रुमाल कोमट पाण्यात बुडवून त्याच्या मदतीने सूज आलेल्या जागेवर शेकवा. असे केल्याने सूज कमी होईल.

केसतोड झालेल्या जागेवर सूज आलेली असल्यास त्यावर मेहंदीचा जाडसर लेप लावा. असे केल्याने सूज कमी होऊन वेदना कमी होतील.

आपल्याला केसतोडसाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: इंडिया टी व्ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *