- आरोग्य

टाचांच्या भेगापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

टाचांना भेगा पडणे हि समस्या कोणालाही होऊ शकते. टाचांना भेगा पडल्या की बर्याजचदा ते वेदना देखील करतात. म्हणूनच आपल्या टाचांवर पडलेल्या भेगावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे.

आज आम्ही तुम्हाला टाचांवर पडलेल्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने काही दिवसात आपल्या टाचावरील भेगा भरून येऊन वेदनाही दूर होईल.

टाचावरील भेगा भरून येण्यासाठी दररोज रात्री झोपण्याआधी हातावर थोडेसे कोरफड जेल घ्या आणि हलक्या हाताने आपल्या टाचांवर लावा. काही दिवस हा उपाय केल्याने टाचावरील भेगा नाहीश्या होतील आणि आपले पाय मऊ होतील.

टाचावरील भेगा घालवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने धुऊन घ्या. आणि आपल्या टाचावर पडलेल्या भेगामध्ये थोडसे व्हॅसलीन लावा. हा उपाय केल्याने टाचावरील भेगा कमी होतात.

टाचावरील भेगा घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. यासाठी रात्री झोपण्याआधी पिकलेल्या केळीची साल मिक्सर मध्ये बारीक करून आपल्या टाचावर लावा.

सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने पाय धुऊन टाका. आपल्याला फरक दिसून येईल. टाचावरील भेगा घालवण्यासाठी रात्री झोपताना पायांना नारळाच्या तेलाने आपल्या तळपायांची मसाज करा.

टाचावर भेगा पडू नये यासाठी पुढील प्रकारे आपल्या पायांची काळजी घ्या. टाचावर भेगा पडू नये यासाठी  आपण थोड्याश्या बारीक मिठामध्ये गुलाब जल लिंबाचा रस आणि ग्लिसरीन मिसळून त्याने आपल्या तळ पायाची मालिश करा. अनवाणी फिरणे टाळा.

आपल्याला टाचावरील भेगा भरून येण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *