- आरोग्य

हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात हि लक्षणे दिसू लागतात

जेव्हा हृदय’रोग होतो तेव्हा रक्तवाहिन्यामध्ये चरबीचे थर रक्तप्रवाह पूर्णपणे ब्लॉक करतात. आणि यामुळे हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपूरवठा होणे थांबते. यामुळे अचानक छातीत असह्य तीक्ष्ण वेदना सुरु होतात. ज्याला ‘हृदयविकाराचा झटका’ म्हणतात.

आपण जेव्हा शारीरिक श्रमाची काम करतो तेव्हा हृदयाला जास्त काम करण्यासाठी अतिरिक्त रक्ताची आवश्यकता असते, रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे ते शक्य होत नाही आणि परिणामी हृदयाच्या स्नायू छातीत संकुचित होतात.

छातीत दुखायला लागते. भारतासारख्या विकसनशील देशात दरवर्षी लाखो लोक हृदयविकारामुळे दगावतात. म्हणूनच आज आपण हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात कोणकोणती लक्षणे दिसू लागतात याची माहिती घेणार आहोत.

हृदयविकाराच्या सुरुवातीला थोडेसे शारीरिक श्रम केल्याने जसे की चालल्याने, धावल्याने, जिना चढल्याने छातीत दुखायला लागून जलद गतीने श्वासोच्छ्वास होऊन गुदमरल्यासारखे व्हायला लागते.

या वेदनाला इंग्रजीत ‘अँजिना पेक्टेरिस’ म्हणतात. थोडासा  निष्काळजीपणासुद्धा तुमच्यासाठी धोकादायक असू शकते, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हृदयविकाराच्या सुरुवातीला काही कारण नसताना अचानक काही सेकंदांसाठी चक्कर येऊ शकते. हृदयविकाराच्या सुरुवातीला काहीच श्रम न करता अचानक दरदरून घाम फुटू शकतो. चेहरा फिका पडतो, कसतरी वाटण, खूप भीती वाटणं अशी लक्षणे दिसून येतात.

हृदयविकाराच्या सुरुवातीला श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागू शकतो. हृदयविकाराच्या सुरुवातीला  कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहतो.

अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावं? अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमत शांतपणे पडून राहा व मदतीसाठी तातडीनं कुणाला तरी बोलवा.

शारीरिक हालचाल करू नका. रुग्ण बेशुद्ध झाल्यास प्रशिक्षित व्यक्तीकडून सीपीआर देण्याचा प्रयत्न करा. त्वरित रुग्णवाहिका बोलवा. तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्या.

आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात कोणकोणती लक्षणे दिसू लागतात हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *