- आरोग्य

पोटावर झोपल्यामुळे आपल्याला होणारे नुकसान

आपल्या शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी आपल्याला शांत आणि चांगली झोप घेण गरजेच असत.  चांगली झोप घेतल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

चांगली झोप घेण हे आपल्या झोपण्याची पद्धतवर अवलंबून असत. प्रत्येक व्यक्ती त्याला जस चांगल वाटेल त्यानुसार त्याच्या सवयीनुसार झोप घेत असतो. परंतु काही जणांना पोटावर झोपायची सवय असते.

पोटावर झोपल्याने चांगली आणि गाढ झोप येते, असे त्यांना वाटत असत. आज आपण पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणांमाची माहिती जाणून घेऊयात.

पोटावर झोपल्याने त्याचा परिणाम आपल्या पाठीच्या कण्यावर होतो. पाठीचा कणा तसंच कमरेवर ताण येतो, आणि कंबरदुखी सुरु होते. कधी कधी पोटावर झोपल्याने मणक्यांची रचना हलण्याची शक्यता असते.

पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा आधार असतो. त्यामुळे झोपताना काळजीपूर्वक झोपल पाहिजे. पोटावर झोपल्याने आपल्याला मानेवर ताण येतो मानदुखीचा त्रास होऊ शकतो.

पोटावर झोपल्याने आपल्या पचन प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकली जात नाहीत. पोट व्यवस्थित साफ होत नाही. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. आपले वजन वाढू लागते.

पोटावर झोपल्याने स्त्रियांच्या छातीच्या आकारामध्ये बदल होतो किंवा त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागतात. पोटावर झोपल्याने जेवणाच्या पचनानंतर उत्सर्जित होणारे वायू शरीराबाहेर जात नाही. त्यामुळे सांधेदुखी सुरु होऊ शकते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन, ब्राईट साईड आणि स्लिप अड्वायजर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *