- आरोग्य

मेथीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मेथीचे दाणे अनेक आजारांवर उपयोगी असतात.मेथीच्या दाण्यांमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट्स फायबर असतात. मेथीचे पाणी अनेक रोगांपासून बचाव करते.

जर आपण दररोज मेथीचे पाणी प्यायलात तर काही दिवसांतच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. आज आपण मेथीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे या विषयी माहिती घेणार आहोत.

सगळ्यात पहिले समजुन घेउयात मेथीचे पाणी कसे बनवायचे. तर त्यासाठी सर्वप्रथम १ ग्लास कोमट पाणी घ्या त्यात २ चमचे मेथी दाणे टाका आणि रात्रभर तसेच राहुद्या सकाळी झोपेतून उठल्यावर

हे पाणी गाळूण घ्या आणि मग प्या म्हणजे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. आता जाणुन घेउयात मेथीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

जर तुम्हाला सांधे दुखीची समस्या असेल तर रोज मेथीचे पाणी पिल्याने तुम्हाला आराम वाटेल. मेथी दाण्यामध्ये असलेल्या लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वामुळे हाडांना मजबूती मिळेल.

मेथीचे पाणी प्यायल्यास केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. तसेच केस गळण्याचे प्रमाण देखील कमी होते. वजन कमी करायचे असल्यास रोज मेथीचे पाणी प्यायल्यास फायदा मिळतो.

मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे मेथीचे पाणी प्यायल्यास लठ्ठपणा कमी होतो आणि आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. मेथीचे पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

मेथी दाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज केली तर केस गळण्याचे प्रमाण देखील कमी होते.

स्त्रियानी रोज १ ग्लास मेथीचे पाणी प्यायल्यास त्याना मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीचा त्रास नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

मेथीचे पाणी प्यायल्यास मेथीमधील तत्वे किडनीमधील स्टोन विरघळवण्यास मदत करतात. मेथीचे दाणे शरीरासाठी गरम असतात, त्यामुळे मेथी दाण्याचे अधिक प्रमाणात सेवन करू नये.

आपल्याला मेथीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: इंडियन एक्सप्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *