- आरोग्य

उकडलेली अंडी खाण्याचे फायदे

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. उकडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने आणि एमिनो एसिडचे प्रमाण जास्त असते. उकडलेली अंडी खाल्याने आपल्या शरीराला उर्जा मिळते.

प्रथिने आणि एमिनो एसिड व्यतिरिक्त त्यात बरेच पौष्टिक घटक देखील असतात. जसे की व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 12, व्हिटॅमिन-डी, व्हिटॅमिन-ई हे अंडी खाल्याने आपल्याला मिळतात म्हणून दररोज सकाळी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर पाहूया उकडलेली अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

अंडयामध्ये ओमेगा -3 आणि व्हिटॅमिन बी 12 हे घटक असतात. जे आपल्या मेंदूला अधिक काम करण्याची शक्ती  देण्यासाठी उपयुक्त असतात. आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उकडलेली अंडी खाणे फायद्याचे आहे.

अंड्यांमध्ये दररोज शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिज असतात, सकाळी अंडी खाण्याचे फायदे दिवसभर शरीरात ऊर्जा राखण्यास मदत मिळते. आपल्याला सारखी सारखी भूक लागत नाही.

उकडलेल्या अंड्यामधील  पिवळ बलकामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे हाडे मजबूत बनवते तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

अंडी स्नायू बळकट करण्यात मदत करते. यात आढळणारे प्रथिने स्नायूंना निरोगी बनवतात आणि त्यांना बळकटपणा प्राप्त करून देतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दोन उकडलेली अंडी खाणे स्नायूंच्या बळकटपणासाठी फायदेशीर आहे.

आपल्या डोळ्यांसाठी उकडलेली अंडी खाणे खूप चांगले आहे. हे आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढविण्यात मदत करते. जर आपण नियमित अंडी खात असाल तर तुमचे डोळे चांगले राहतील.

उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम आढळत, जे रोगप्रतिकारक यंत्रणा निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणून आपण अंड्याचे सेवन केले पाहिजे.

महिलांनी त्यांच्या आहारात उकडलेल्या अंड्याचा समावेश करू शकता अंड्याच्या सेवनाने रोजचे परिश्रम करायला ताकद मिळते.

100 ग्रॅम अंड्यात सुमारे 155 कॅलरी असतात म्हणून हा उर्जाचा एक चांगला स्रोत मानला जातो. हे आपल्या शरीरात त्वरित उर्जा देण्याचे कार्य करते.

उकडलेली अंडी खाल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. अंडी फक्त केसांना लावण्यानेच नव्हे तर ते खाल्ल्याने केसांनाही फायदा होतो.

अंडी खाल्ल्याने केसांची जलद वाढ होण्यास मदत होते आणि केस निरोगी राहतात. केस गळणे ही कमी होते. त्यामुळे तुमच्या आहारात उकडलेल्या अंड्यांचा समावेश करा.

आपल्याला उकडलेली अंडी खाण्याचे फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *