- इन्फोमराठी

७/१२ उताऱ्यावर वारसाची नोंद कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

बऱ्याच जणांना वारस नोंद कधी आणि कशी करावी? हे माहिती नसते. आज आपण या लेखात ७/१२ उताऱ्यावर वारसदाराची  नोंद कशी करावी या विषयी जाणून घेणार आहोत.

हा हक्क जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलाम १४९ प्रमाणे तयार करण्यात आला आहे. ज्यावेळी वडिलोपार्जित संपत्ती नावावर करायची असते तेव्हा आजोबांच्याकडून वडिलांना आणि वडिलांकडून मुलाला संपत्ती मिळते. ज्यावेळी वडिलांचे निधन होते, त्यानंतर त्यांची संपत्ती वारसदाराला मिळते. यासाठी बरेच कागदोपत्री व्यवहार करावे लागतात.

यासाठी सर्वात आधी मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू दाखला काढणे आवश्यक आहे. खेडेगावात हा दाखला ग्रामपंचायतमध्ये मिळतो, शहरी भागात हा दाखला नगरपालिका, महानगरपालिका जन्म-मृ-त्यू विभागात मिळतो.

त्याआधी मृ-त्यू झालेल्या व्यक्तीची नोंद होणे आवश्यक असते. ३ महिन्याच्या आत वारसा नोंदणी करण्यासाठी देणे आवश्यक आहे.

यासाठी मृ-त्यू झालेल्या व्यक्तीचे निधन किती तारखेस झाले, त्या व्यक्तीच्या नावावर कोणती जमीन आहे, एकूण वारसदारांची संख्या किती या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

वारसा नोंद करताना निधन झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला काढून वारसा नोंदणीसाठी कर्ज करावा. रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि काही प्रतिष्ठित नागरिकांचे विचार घेऊन अर्जामध्ये लिहलेल्या माहितीची चौकशी केली जाते.

वारसा फेरफार ठराव मंजूर करून नोंद घेतली जाते. त्यानंतर सर्व वारसदारांना नोटीस दिली जाते. १५ दिवसात याबाबत कायदेशीर आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद केली जाते. यासाठी लागणारी कागदपत्रे: मृ-त्यू प्रमाणपत्र, तलाठी अहवाल.

वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे: रेशन कार्ड प्रत, विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प असलेल्या अर्ज आणि शपथपत्र, वारस हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी.

बँक, विमा रक्कम इ. बाबत नॉमिनी (मृ-त्यू-नंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे लिहले असेल तर त्या व्यक्तीला ती रक्कम मिळू शकते.)

मृ’त व्यक्तीच्या नावावरील ८ अ चे उतारे, वारसदाराचे पत्ता इत्यादी.  वारसदाराची नोंद करताना त्या व्यक्तीच्या धर्मानुसार वारसा कायद्याचे नियम लागू पडतात.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: ९९ एकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *