- आरोग्य

केसांचे गळणे कमी करायचे असेल आहारात करा हा बदल

केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी फक्त उपाय करणे हा एकच पर्याय नसून तुमच्या अन्न पदार्थांच्या सेवनावरही केस गळतीची समस्या अवलंबून असते. त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.

जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल, खनिजे यांचे प्रमाण योग्य नसेल तर केस गळू शकतात. यासाठी कोणत्या अन्न पदार्थांचा समावेश आहारात करावा हे तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळेल.

पालक ही अशी भाजी आहे जी अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. पालक भाजी ही लोहाचा चांगला स्रोत आहे. तसेच यात व्हिटॅमिन ए, सी आणि प्रोटीन आहे. यात असलेल्या घटकांमुळे केसांना नैसर्गिक कंडिशनर मिळते.

याशिवाय ओमेगा ३ ऍसिड, मँगनेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे घटक मिळतात. हे सर्व घटक आपल्या केसांसाठी पोषक असतात. आहारात पालकचा समावेश केल्याने केस गळणे कमी होऊ शकते.

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे केसांच्या वाढीसाठी गरजेचे असते. केसांना दाट, चमकदार करण्यासाठी आणि शरीरामध्ये रक्त संचार वाढविण्यासाठी, प्रदूषपासून होणाऱ्या धोक्यापासून केसांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक घटक गाजरामध्ये असतात. आहारात गाजराचा समावेश केल्याने केस गळतीची समस्या कमी होते.

केस गळणे कमी करण्यासाठी आपल्या आहारात अंड्याचा समावेश करा. अंडी हे बायोटिनचा चांगला स्रोत आहेत. बायोटिन केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

आक्रोडमध्ये बायोटिन, व्हिटामिन बी१, व्हिटामिन बी६, आणि व्हिटामिन बी९ आहे. प्रोटीन आणि मँगनेशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस सुदृढ राहतात. यात असलेल्या पोषक तत्वांमुळे स्काल्पला योग्य पोषण मिळते. आणि केस गळणे कमी होते.

प्रोटीन, लोह, झिंक आणि बायोटिन या सर्व पोषक तत्वांचा उत्तम स्रोत म्हणजे कडधान्याच्या डाळी. डाळींमध्ये फॉलिक ऍसिड असते, जे लाल रक्त पेशींची वाढ करते. आणि केस मजबूत करते.

आहारात स्टॉबेरीचा समावेश केल्याने केस गळणे कमी होऊ शकते. स्टॉबेरीमध्ये सिलिका असते, जे केसांना मजबुती देण्यास आणि केसांच्या विकासासाठी उपयुक्त असते. तसेच पेरूमध्ये संत्र्यापेक्षा ५ पट अधिक व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे केसांचे गळणे कमी होते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *