- आरोग्य

गुडघे दुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

गुडघे दुखी ही समस्या सामान्य आहे. जर तुमचे वजन वाढले असेल तर तर ही समस्या निर्माण होऊ शकते. तसेच जर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर हाडे ठिसूळ होऊन गुडघेदुखी होऊ शकते.

ही अत्यंत वेदनादायी समस्या आहे. त्यामुळे या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग पाहूया गुडघे दुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय.

आल्यामुळे गुडघेदुखी कमी होते. मसल्स दुखत असतील तर आल्याच्या सेवनामुळे ही समस्या दूर होते. यासाठी आल्याचा रस पाण्यात टाकून उकळून घ्या आणि यामध्ये मध अथवा लिंबू घालून हा रस प्या. असे केल्याने गुडघे दुखी कमी होण्यास मदत मिळेल.

गुडघे दुखी कमी करण्यासाठी गुडघ्याची मोहरीच्या तेलाने मालिश करा. मोहरीचे तेल उष्ण असते. त्याने मालिश केल्याने आपल्याला लवकर आराम मिळू शकतो.

गुडघे दुखी कमी करण्यासाठी एक लहानसा बर्फाचा तुकडा घ्या तो रूमालामध्ये गुंडाळून त्याने गुडघ्यांवर शेक द्या. त्यामुळे गुडघे दुखी कमी होण्यास मदत होईल.

गुडघे दुखी कमी करण्यासाठी काही व्यायाम आहेत. रोज सकाळी योगासने करून तुम्ही गुडघेदुखी कमी करू शकता. यासाठी ताडासन, पर्वतासन, त्रिकोणासन, भुजंगासन असे योगा प्रकार केल्याने गुडघे दुखी कमी होईल.

रोज सकाळी सूर्य नमस्कार केल्याने गुडघे दुखीची समस्या दूर होण्यास मदत होते. योगासने करणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. गुडघ्याची समस्या कमी करण्यासाठी योगासने मुख्य भूमिका निभावतात. रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम करणे गुडघ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे.

गुडघे दुखीचा त्रास होऊ नये यासाठी आपण आहारात कॅल्शियमयुक्त गोष्टींचा समावेश केला पाहिजे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असत. आपण त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकता. तसेच सुकामेवा म्हणजेच काजू बदाम अंजीर यांचा हि आहारात समवेश करू शकता.

आपल्याला गुडघेदुखी कमी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *