- आरोग्य

कोरडा खोकला कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे सर्दी खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा हि दुखू लागू शकतो. खोकला आला कि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते खोकला जास्त प्रमाणात वाढला तर डोकेदुखी सुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत कोरडा खोकला कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

खोकल्यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे कोमट दुध आणि हळद या दोन्हींचे मिश्रण करून जर तुम्ही घेतले तर तुमचा खोकला लवकर बरा होईल हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकला वाढण्यास रोखते.

दररोजच्या जेवणात 1 – 2 लसणाच्या – पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. हा अगदी साधासोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे.

कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. त्याचे सेवन करण्यासाठी मधात मिसळून कोरफड रस प्या.

आल्याचा चहा पिल्याने देखील खोकला कमी होतो. सर्दी खोकला ताप या आजारांमध्ये आले बारीक करून पाण्यातून उकळून आल्याचा रस दिला तरीदेखील खोकल्या पासून सुटका होईल.

अति प्रमाणात खोकला अथवा वारंवार खोकला होत असेल तर तुम्ही मधासोबत हळद देखील घेऊ शकता यामुळे खोकला कमी होतो आणि घशाला आराम मिळतो.

कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी आपण दिवसातून तीन ते चार वेळा कोमट पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. असे केल्याने घसा मोकळा होऊन खोकला कमी येईल.

खोकल्यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे तुळस. तुळशीची पाने गरम पाण्यामध्ये उकळून त्याचा रस केल्याने देखील खोकला निघून जातो अथवा तुळशीची पाने चघळा. तुळशीच्या सेवनाने लगेच आराम मिळतो.

ज्येष्ठमधाची काडीने देखील खोकला कमी होतो. जेष्ठमधाची पूड असेल तर ती गरम पाण्यामध्ये टाकून पिल्याने खोकला बरा होतो. ज्येष्ठ मध खाल्ल्याने तुमचा घसा बसला असल्यास तोही बरा होईल.

आपल्याला कोरडा खोकला कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *