- आरोग्य

चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे घरगुती उपाय

महिला चेहऱ्याच्या सुंदरतेकडे विशेष लक्ष पुरवतात. चेहऱ्याची काळजी घेतात तरीही चेहऱ्यावर काळे डाग उठतात ज्याला सामान्य भाषेत “वांग” असे म्हणतात. हे डाग सूर्याची प्रखर किरणे, औषधे, ऍलर्जी अशा विविध कारणांमुळे होतात.

चेहऱ्यावर आलेल्या वांग मुळे चेहरा निस्तेज होतो. कुरूप झालेल्या चेहऱ्यामुळे अनेकजण निराश होतात सेल्फ कॉन्फिडन्स हरवून बसतात.

परंतु ही मोठी समस्या नाही. आज आम्ही अनेक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांने चेहऱ्यावरील वांग नाहीसे होतील व चेहरा पुन्हा उजळून दिसेल.

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी दह्यामध्ये नैसर्गिक असणार लॅक्टिक ऍसिड त्वचेवरील डाग कमी करण्यास उपयोगी आहे. यासाठी दह्याचा लेप वांग वरती लावा व 20 मिनिटांनी धुवून घ्या. दह्यात वाटलेले बदामही मिक्स करू शकता. या उपायाने वांग जाण्यास साधारण पंधरा दिवस तरी लागतील.

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी एक केळी त्यानंतर घ्या  केळी कुस्करून घ्या. केळं कुस्करल्यावर त्यात थोडेसे दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग आलेल्या भागावर लावा.

25 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.  असे केल्याने चेहऱ्यावरील वांग नाहीसे होतील व चेहरा पुन्हा उजळून दिसेल.

त्वचेच्या प्रत्येक समस्येवर कोरफड रामबाण उपाय आहे. चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी दोन चमचे कोरफड व एक चमचा मध या प्रमाणात मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. पंधरा वीस मिनिटांनी धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास वांग जाऊन चेहरा चमकदार होतो.

बटाटा प्रत्येक घरात सहज मिळतो. वांग घालवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. यासाठी कच्चा बटाटा घेऊन त्याचे दोन भाग करा. त्यावर पाण्याचे दोन चार थेंब टाकून वांग वरती ठेवा.

दहा ते पंधरा मिनिटांनी काढून कोमट पाण्याने धुवुन घ्या. महिन्यातून चार वेळा हा उपाय केल्यास फरक दिसेल. बटाट्यामधील कॅटेकोलेज नावाचा घटक मेलानोसाइट्स निर्माण होऊन देत नाही हे वांगवरती प्रभावीपणे काम करतात.

चंदनाचा वापर पूर्वीपासून चेहरा उजळण्यासाठी केला जातो. चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर चंदन रामबाण उपाय आहे. चेहऱ्याच्या वांगांवरही चंदन प्रभावीपणे काम करते.

यासाठी चंदन पावडर व गुलाबपाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टचा लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावून ठेवा. साधारण अर्ध्या तासाने धुवून घ्या. या उपायाने काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी मसूर बारीक वाटून दूध व थोडं तूप एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास वांगांवर गुणकारी ठरते. यामुळे चेहऱ्यावरील वांग जाऊन चेहरा तेजस्वी दिसू लागतो.

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी अर्धा चमचा अपल सायडर व्हिनेगर एका वाटीत घ्या. त्या मध्ये दोन चमचे पाणी मिसळा कापसाच्या मदतीने ते आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग आले आहे त्या ठिकाणी लावा.

15 मिनिट राहूद्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपला चेहरा परत पूर्वीसारखा होण्यास मदत मिळेल. चांगल्या परिणामासाठी हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता.

आपल्याला चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *