- आरोग्य

तोंडाला आलेल्या फोडा पासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढल्याने, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्याने, गोड पदार्थांचे सेवन केल्याने, व्यवस्थित झोप न घेतल्याने तोंडाला आतून फोड येतात.

तोंडाला आतल्या बाजूने फोड आल्यावर खूप वेदना होत असतात. आज आम्ही काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण काही तासात तोंडाला आलेल्या फोडा पासून आराम मिळवू शकता.

तोंडाला आलेल्या फोडापासून आराम मिळवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. यासाठी कोथिंबीर बारीक कापून २ ग्लास पाण्यात मिसळून 10 मिनिटे उकळून घ्या. थंड झाल्यावर ह्या पाण्याने गुळण्या करा.

असे केल्याने आपल्या तोंडाला आलेले फोड कमी होतील आणि वेदना हि कमी होतील. आपल्याकडे  कोथिंबीर उपलब्ध नसल्यास आपण धने उकळून त्या पाण्याने हि गुळण्या करू शकता.

तोंडाला फोड आल्यास शक्य असल्यास दिवसातून दोनदा नारळ पाणी प्या. नारळाचे पाणी पिण्यामुळे आपल्याला शरीराला शीतलता येईल आणि अल्सर पासून आराम मिळेल.

तोंडाला आलेल्या फोडावर हळद लावल्यास ते पसरत नाही आणि कोरडे होऊ लागतात. हळद पाण्यात उकळवा आणि त्या पाण्याने सकाळी आणि संध्याकाळी गुळण्या करा. यामुळे फोड बरे होतील आणि एका दिवसातच आपल्याला आराम मिळेल.

तोंडाला आलेल्या फोडापासून आराम मिळवण्यासाठी आपण ओले खोबरे खाऊ शकता. तोंडाला आलेल्या फोडावर कोरफडाचा गर लावल्याने हि आपल्याला लवकर आराम मिळू शकतो.

तोंडाला आतल्या बाजूने जादा फोड आले असल्यास एक ग्लास पाण्यास एक चमचा मीठ मिसळून त्या पाण्याने दिवसातून ४ ते ५ वेळा गुळण्या करा. असे केल्याने तोंडातील जखम भरुन येण्यास मदत मिळेल.

तोंडाला आलेल्या फोडापासून आराम मिळवण्यासाठी हिरवे वेलची दाणे बारीक करून पावडर बनवा. नंतर त्यात दोन थेंब मध घाला. ही पेस्ट फोडांवर लावा आणि कोरडे होऊ द्या. दिवसातून तीन वेळा हा उपाय करा. असे केल्याने तोंडाची उष्णता दूर होते आणि फोड देखील बरे होतात.

आपल्याला तोंडाला आलेल्या फोडांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: फार्म इजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *