- आरोग्य

मासिक पाळीच्या दरम्यान पोट दुखी होऊ नये यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळी हि स्त्रियांमधील नैसर्गिक क्रिया असते. साधारण पणे मासिक पाळी हि चार ते पाच दिवस येत असते. प्रत्येक स्त्रीची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली वेगवेगळी असते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान प्रत्येक स्त्रीला होणारा त्रास हि वेगवेगळा असतो.

काही स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान पोटात वेदना होतात. तर काही जणींना अंग दुखी कंबरदुखी ला सामोरे जावे लागते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. मासिक पाळीच्या दरम्यान पोट दुखी होऊ नये यासाठी घरगुती उपाय

रताळी खाल्ल्याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते. रताळ्यामध्ये असलेले अँटीस्पॅज्माडिक गुण वेदना सहन करण्यास मदत करतात.

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी शक्य तितका हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार, अति मीठ घातलेले पदार्थ खाणे टाळा.

आपल्या शरीरात व्हिटामिन डी ची कमतरता असल्यास मासिकपाळी येण्याच्या आधी आणि मासिकपाळीच्या दरम्यान अंगदुखी तसेच कंबरदुखी जाणवत असते.

शरीरातील व्हिटामिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. तसेच मासिक पाळी येण्याच्या आधी काही दिवस नियमित 5 ते 8 बदाम भिजवून सालीसकट खा.

असे केल्याने आपल्या शरीरातील व्हिटामिन डी ची कमतरता दूर होण्यास मदत मिळेल. योग्य पोषक घटकयुक्त आहार घेतल्यास आपल्याला या समस्या जाणवणार नाही.

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सकाळी आणि संध्याकाळी 1 चमचाभर तुळशीचे बी थोड्याश्या पाण्यात 1 मिनिटे भिजवून खा. असे केल्याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी मदत मिळेल.

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून 2 चमचे मेथीच्या बिया रात्री कपभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्या. असे केल्याने मासिकपाळी दरम्यान होणारी अंगदुखी कमी होण्यास मदत मिळेल.

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी शरीराला पुरेसा आराम मिळणे हि गरजेचे असते. यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी.

हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. हा लेख हेल्थलाईन या नामांकित ब्लॉगवरील संदर्भ घेऊन लिहण्यात आला असून इंग्रजी लेख हा डॉक्टर डेब्रा रोस विल्यम यांनी रिव्यू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *