- आरोग्य

भिजवलेले बदाम रोज सकाळी खाण्याचे जबरदस्त फायदे

बदाम खाल्याने स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते हे तर आपण बऱ्याचदा ऐकले असेल किंबहुना आपल्याला माहित देखील असेल. पण भिजवलेले बदाम रोज सकाळी खाल्याने आणखी कोणते फायदे होतात हे बहुतांश लोकांना अद्याप माहित नाहीत. चला तर म आज जाणून घेऊयात भिजवलेले बदाम रोज सकाळी खाल्याने शरीराला कोणत्या फायद्यांचा लाभ मिळतो.

भिजवलेले बदाम हे सुक्या बदामांपेक्षा पचायला हलके असतात. तसेच भिजवलेल्या बदामामधून आपल्याला कॅल्शियम, लोह, आणि मॅग्नेशियम, व्हिटामिन इ असे पोषक घटक जास्त प्रमाणात मिळू शकतात.

बदामाचे दररोज सेवन केल्याने आपले डोळे तेजस्वी होण्यास मदत होते. आपल्या मानवी डोळ्यांसाठी बदाम भरपूर लाभ देणारे आहे.

भिजवलेल्या बदामाची साल न काढता त्याचे देखील सेवन करावे यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होते. बदामात असलेल्या तांब्याचा प्रमाणामुळे रक्त शुद्ध करण्यास देखील मदत होते.

सर्दीवर रामबाण उपाय म्हणजे भिजवलेले बदाम. सर्दी कमी करण्यासाठी भिजवलेले बदाम आणि गरम दूध यांचे एकत्रित सेवन करावे.

ग’रो’द’र असलेल्या स्त्रियांनी आपल्या दररोजचा आहारात बदामाचे सेवन नियमित करावे. यामुळे ग’र्भा’च्या वाढीसाठी मोठी मदत होते. ग’र्भा’च्या मेंदूची आणि चेता संस्थेची वाढ बदामाचे सेवन केल्याने होते.

केसगळतीचा त्रास जर आपणास असेल तर केस गळणे कमी करण्यासाठी देखील बदाम खूप फायदेशीर ठरते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बदामाचे सेवन करावे.

चरबी कमी करण्यासाठी बदामाचे सेवन आपण नियमित करायला हवे. हृदयाशी निगडित अनेक विकारांपासून दूर राहण्यासाठी बदाम खावेत. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर ठरते.

पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील बदाम खाल्याने लाभ मिळतो. त्यामुळे रोज सकाळी भिजवलेले बदाम आपण खावेत. बदामाचे अति सेवन करू नयेत प्रमाणात बदाम खावेत.

बदामात असलेले कॅल्सियम आणि फॉस्फरस या घटकांमुळे हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत होते. रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढवण्याची सुद्धा बदाम उपयुक्त ठरते.

आपल्याला भिजवलेले बदाम सकाळी खाण्याचे फायदे  हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: एन डी टी व्ही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *