- आरोग्य

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आजच सुरु करा हा “डायट प्लान”

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण रोज काय खातो याकडे आपले तितके लक्ष नसते. याचाच परिणाम आपल्याला पोटावर झालेला दिसतो.

आपल्या आहारात तेलकट, मैदायुक्त पदार्थ, तसेच पुरेशे फायबर नसलेले पदार्थ असतील तर आपले पोट वाढू लागते. एकदा वजन वाढले कि मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अगदी सहजपणे आपल्याला होऊ शकतात.

म्हणून वेळीच आपण आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत वजन कमी करण्यासाठी आदर्श डायट प्लान.

सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास मेथीचे दाणे असलेले पाणी प्या. मेथीचे पाणी प्यायल्याने चयापचय (पाचन शक्ती) सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत मिळते. (वेळ साधारणपणे 6.30 ते 7.30)

सकाळच्या नाश्त्यामध्ये एक प्लेट पोहे, अथवा इडली खा. शक्य असल्यास सोबत 4 ते 5 बदाम हि खाऊ शकता. (वेळ साधारणपणे 7.30 ते 8.30) साधारणपणे 10.00 वाजता एक ग्लास दुध किंवा फळांचा रस प्या.

दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी घरात बनवलेली कोणतीही भाजी चपाती असल्यास 2 चपात्या आणि भाकरी असल्यास एक भाकरी एक वाटी कोशिंबीर आणि जेवणाच्या दहा ते पंधरा मिनिटांनंतर एक वाटी ताक प्या. तरीही भूक असेल तर आपण एक काकडी खाऊ शकता. (वेळ साधारणपणे दुपारी 12:30 ते दुपारी 1:00)

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये एक वाटी मोड आलेले कडधान्य यामध्ये तुम्ही मुग, मटकी अशा गोष्टींचा समावेश करू शकता. अथवा एक छोटी प्लेट भरून काकडी, गाजर, बीट, मुळा अशा गोष्टी खाऊ शकता.

रात्रीच्या जेवणात एक वाटी पालेभाज्या अर्धी भाकरी अर्धी वाटी दही एक वाटी कोशिंबीर आणि सलाड यांचा समावेश करा.

दिवसभरात वरती सांगितले आहे त्या प्रमाणात आपण आहार घेतला तर आपल्याला साधारणपणे 1500 कॅलरीज आपल्याला त्यातून भेटतील.

हा आहार आपण एक आठवडा घ्यायचा आहे त्यानंतरचा डायट प्लान पुढील भागात आपल्याला वाचायला मिळेल. डायट प्लान संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण ते कमेंट मध्ये सांगा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *