- आरोग्य

दातांच्या पिवळेपणा पासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय

आपले दात पांढरे शुभ्र असावेत अस प्रत्येकाला वाटत असत. परंतु आपल्याला दिवसातून अनेक वेळा कॉफी प्यायची सवय असेल, धु’म्र’पा’न करायची सवय असेल तर, आपण तं’बा’खू’चे सेवन करत असाल तर आपले दात पिवळे दिसू लागतात.

आणि यामुळे आपल्याला बऱ्याचदा पेच प्रसंगाचा सामना करावा लागतो. दात पिवळसर झाल्यामुळे आपण उघडपणे हसू ही शकत नाही. दात पिवळसर झाल्यामुळे कधीकधी आपला आत्मविश्वास देखील कमी होतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. दातांच्या पिवळेपणा पासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय

दातांच्या पिवळेपणा कमी करण्यासाठी संत्र्याची साल सुकवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. सकाळी दात घासण्याच्या आधी कमीतकमी दोन मिनिटे ह्या पावडरने दात घासा आपल्याला काही दिवसातच फरक दिसून येईल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि घट्ट पेस्ट बनवा. ब्रशच्या सहाय्याने ही पेस्ट दातांवर लावा. व मिनिटभरासाठी राहू द्या. नंतर तोंड धुऊन टाका असे केल्याने आपले दात पाहिल्यासारखे शुभ्र आणि चमकदार दिसू लागतील.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी सकाळी दात घासण्याआधी केळ्याच्या सालीचा पांढरा भाग आपल्या दातांवर एक ते दोन मिनिटे चोळा. यानंतर दात घासा. असे आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल तसेच आपले दात मजबूत होतील.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तोंड नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे आणि कमीतकमी दिवसातून दोनदा ब्रश केले पाहिजे. दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातांवरील पिवळसरपणा हळूहळू नाहीसा होऊ लागतो.

धूम्रपान केल्यामुळे आपले दात पिवळसर दिसू लागतात शिवाय धुम्रपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता हि असते. म्हणूनच आपण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी धुम्रपान करणे थांबवा.

आपल्याला दातांच्या पिवळेपणा पासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन, डॉक्टर फ्रॅंक, डी डी एस यांनी इंग्रजी लेख वैद्यकीयदृष्टया तपासून पहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *