- आरोग्य

बहुगुणी अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपल्या महाराष्ट्रात अंजीराचे मोठे उत्पादन होते. अंजीर आरोग्यासाठी लाभदायक फळ आहे. लहान पण लुसलुशीत ताजे अंजीर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते. आजारपणात अंजीर आवर्जून खाण्यास दिले जाते.

अंजीरात कॅल्शियम, फॉ़स्फरस, व्हिटॅमिन ए , सी, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम असे भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. इतर फळांच्या तुलनेत यात अधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ आढळतात. चला तर जाणून घेऊयात अंजीराचे आरोग्यदायी फायदे.

पित्ताची तक्रार अलीकडे सर्वांचीच असते. अंजीर हे फळ थंड आहे हे तुमच्या शरीरातील पित्ताचा त्रास नाहीसा करते. आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता वाढली असल्यास अंजीराच्या सेवनाने उष्णतेचा त्रास होत नाही. अंजीर पचनशक्तीत वाढ करते.

अंजीरात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असते. जे आपल्या शरीरातील साखरेचे व ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. अंजीरातील गुणधर्मामुळे शरीरात इन्शुलिन निर्माण होण्याचे प्रमाण वाढते यामुळे डायबिटीज पासून आपल्या शरीराचा बचाव होतो.

अंजीरात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. हे आपल्या आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. आपल्या हाडांना, दातांना, मुख्यतः कॅल्शियम व व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते जी अंजीर पुरवते.

अंजीरात भरपूर प्रमाणात सोल्युबल फायबर्स आढळतात. हे आपल्या शरीरातील अनावश्यक कोलेस्ट्रॉल वाढण्याला नियंत्रणात ठेवतात. अंजीरातील अँटीऑक्सिडेंट शरीरात निर्माण होणाऱ्या फ्री रॅडीकल्सचा नायनाट करतात. अंजीरातील या तत्वामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी रहाते तसेच अनावश्यक वजन वाढत नाही.

बद्धकोष्टतेच्या त्रासातून अंजीर तुम्हाला लवकर सोडवते. अंजीर हे तंतुमय फळ आहे तसेच यात भरपूर प्रमाणात फायबर्स आढळतात जे आपल्यापोटासाठी आवश्यक असतात. अंजीराच्या सेवनाने बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो.

अंजीराचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत मिळते. रात्री झोपायच्या आधी कपभर दुधासोबत सुकवलेले अंजीर नियमितपणे सेवन केल्यास पौरुषत्व वाढण्यास मदत मिळते.

आपल्याला अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: फार्म इजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *