- आरोग्य

थायरॉईड विकार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात

थायरॉईड आज एक सामान्य आरोग्याची समस्या बनलेली आपल्याला दिसत आहे. स्त्रियांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. थायरॉईड हे मानेच्या खालच्या बाजूला दिसायला फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असतात, जे चयापचय गती नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करण्याचे कार्य करतात.

आपल्याला कधीही आणि काहीही खाण्याची सवय असल्यास ती आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. यामुळे आपल्या थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन आपल्याला थायरॉईड विकार होण्याची शक्यता असते.

तसेच आपल्या आहारात आयोडीनचा समावेश नसल्यास थायरॉईड विकार होण्याची शक्यता असते. आज आपण जाणून घेणार आहोत थायरॉईड विकार होण्याआधी आपल्या शरीरात कोणकोणती लक्षणे दिसून येतात.

थायरॉईड विकार होण्याआधी बहुतेकदा आपल्या मानेला सूज येते. बऱ्याचदा घश्यात जळजळ हि होऊ लागते. थायरॉईड विकार होण्याआधी आपल्याला सारखीच अस्वस्थता वाटू शकते. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून हि चिडचिड होऊ शकते.

अचानकपणे आपली केस जास्त प्रमाणात गळायला लागतात. थायरॉईड विकार होण्याआधी अचानकपणे आपले वजन वाढू लागते. अथवा झपाट्याने वजन कमी होऊ लागते.

हायपोथायरायडिझम असलेल्या लोकांना बऱ्याचदा नेहमीपेक्षा जास्त थंडी जाणवते. अथवा अत्यधिक घाम यायला लागतो. तापमान नियंत्रित करण्याची शरीराची क्षमता कमी झाल्याने असे होत असते.

स्त्रीयांना जर थायरॉईड विकार असेल तर मासिक पाळी अनियमित होते. बऱ्याचदा थायरॉईड विकार होण्याआधी चेहऱ्यावर सूज हि येऊ शकते.

बऱ्याचदा थायरॉईड विकार होण्याआधी प्रतिकारशक्ती कमी होते. आपण सारखे सारखे आजारी पडू लागता. स्त्रीयांमध्ये अशी लक्षणे आपल्याला दिसत असल्यास आपण वेळीच डॉक्टरांची मदत घेतल्यास थायरॉईड विकार लवकर बरे होऊ शकतात.

आपल्या आहारात आयोडिनचे योग्य प्रमाण नसेल तर थायरॉईड विकार होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या आहारात आयोडिनयुक्त मिठाचा समावेश असुद्या.

आपल्याला थायरॉईड विकार होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात. हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेअल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *