गुळवेल हि अशी वनस्पती आहे, जिचा वापर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो. गुळवेलाचा वापर अनेक आजारांच्या उपचारांमध्ये केला जातो. आपण गुळवेलाचा वापर केल्यास बर्या्च आजारापासून आपल्याला आराम मिळू शकतो आणि आपले शरीर नेहमी रोगमुक्त राहू शकते.
गुळवेलामध्ये आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण पोषक घटक अँटीऑक्सिडंट लोह, फॉस्फरस, तांबे, कॅल्शियम, जस्त, मॅंगनीज असतात. आज आपण जाणून घेणार आहोत गुळवेलाचे आरोग्यवर्धक फायदे.
जेव्हा हवामान बदलते तेव्हा त्यामुळे आरोग्याशी संबंधित बऱ्याचश्या समस्या उद्भवू लागतात. वातावरण बदलामुळे होणारे आजार जसे कि सर्दी, खोकला, ताप येणे अशा वेळी गुळवेलाचा काढा घेतल्याने आपल्याला आराम मिळू शकतो.
गुळवेलाचा काढा घेतल्याने काही दिवसांत रोग प्रतिकारशक्ती वाढते. गुळवेलाचा काढा घेतल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळेल.
गुळवेलाच्या काढ्याचे सेवन केल्याने किडनी आणि यकृतामधून विषारी पदार्थ बाहेर येण्यास मदत मिळेल तसेच रक्त ही शुद्ध होईल.
गुळवेलाच्या काढ्याचे सेवन केल्याने चेहर्यागवरील सुरकुत्या, मुरुम नाहीशे होण्यास मदत मिळेल. गुळवेलाच्या काढ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत होणारी वाढ रोखता येऊ शकते. गुळवेलाच्या काढ्याचे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते.
घरच्या घरी गुळवेलाचा काढा बनविण्यासाठी, सर्व प्रथम गुळवेलाचा बोटभर लांब तुकडा थोडासा ठेचून घ्या. त्यानंतर एका पातेल्यामध्ये अंदाजे 2 ग्लासभर पाणी घ्या.
त्यामध्ये ठेचलेला गुळवेलाचा तुकडा घालून ते मंद आचेवर उकळायला ठेवा. जेव्हा पातेल्यातील अर्धे पाणी शिल्लक असेल तेव्हा गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. अशा प्रकारे आपला काढा तयार होईल.
लक्षात घ्या गुळवेलाचा काढा हा अत्यंत गुणकारी असतो. मात्र त्याचे “अति सेवन करू नये”. तसेच महिन्यातील आठच दिवस त्याचे सेवन पुरेशे असते.
आपल्याला गुळवेलाचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: फार्म इजी ब्लॉग