- आरोग्य

घामोळ्या घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

तीव्र उन्हामुळे आणि घामामुळे त्वचेला खाज सुटते आणि लहान लहान पुरळ येतात त्यालाच घामोळ्या अस म्हटल जात. जर आपण याकडे लक्ष दिले नाही. तर हे लहान लहान पुरळ संपूर्ण शरीरावर येऊ शकतात. म्हणून वेळीच त्यांच्यावर इलाज करणे गरजेचे असते.

आपल्या शरीरावर घामोळ्या आल्यातर चिडचिड न करता त्याची योग्य काळजी घ्या म्हणजे त्या आपल्या शरीरावरून लवकर निघून जातील. आज आपण जाणून घेणार आहोत. घामोळ्या घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

आपल्या शरीरावरील घामोळ्या घालवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कोरफडीचा गर यासाठी सर्वप्रथम कोरफड काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर त्यामधील गर काढून शरीरावर ज्या ठिकाणी घामोळ्या आल्या आहेत त्या ठिकाणी लावा. असे केल्याने आपल्या शरीरावरील घामोळ्या निघून जातील.

आपल्या गळ्यावर पाठीवर घामोळ्या आल्या असतील तर त्या जाण्यासाठी आपण त्यावर मुलतानी माती थोड्याश्या थंड पाण्यात मिसळून हलक्या हाताने लावू शकता. सुकल्यावर पाण्याने धुऊन टाका. मुलतानी मातीमुळे घामोळ्यांची खाज कमी होते.

घामोळ्यामुळे खाज येत असेल तर एका वाटीमध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे थंड पाणी मिसळून चांगली पेस्ट बनवून घ्या आता हि पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी लावा. 10 मिनिटे राहूद्या नंतर धुऊन टाका. हि पेस्ट लावल्यानंतर थोड चुरचुरेल पण नंतर आराम मिळेल.

घामोळ्या घालवण्यासाठी आपण कडूलिंबाच्या पानांचा हि उपयोग करू शकता. कडुलिंबामध्ये प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

घामोळ्याना खाज येत असल्यास त्या ठिकाणी आपण कडूलिंबाच्या पानांची पेस्ट करून लावू शकता. असे केल्याने खाज येणे थांबेल. तसेच सकाळी अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने घालून अंघोळ करा. आपल्याला घामोळ्यापासून आराम मिळेल.

आपल्या गळ्यावर पाठीवर घामोळ्या आल्या असतील तर त्या जाण्यासाठी आपण चंदन पावडरचा हि वापर करू शकता. चंदन पावडरमध्ये वेदनशामक गुणधर्म असतात, ज्यामुळे ते वेदना कमी करू शकते. थोडीशी चंदनाची पावडर पाण्यात मिसळून ज्या ठिकाणी घामोळ्या आल्यात त्या ठिकाणी लावावी. यामुळे जळजळ कमी होऊन आराम मिळेल.

घामोळ्या घालवण्यासाठी आपण नारळ तेलाचा हि उपयोग करू शकता. नारळ तेल नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. आणि त्वचेचे पोषण व हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्वचेवरील घामोळ्या बऱ्या करण्यासाठी नारळ तेल प्रभावी आहे. नारळ तेलाचा वापर केल्याने त्वचेवर येणारी खाज हि कमी होते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *