- आरोग्य

कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

बऱ्याचदा आपल्या शरीराच्या इतर अवयावापेक्षा हाताच्या कोपरांवरील त्वचा काळवंडलेली दिसते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कि आपले हाताचे कोपर अस्वच्छतेमुळे काळवंडत नाही, तर कोपरावर मृत पेशी साठल्याने हा भाग काळवंडलेला दिसत असतो.

स्टायलिश शॉर्ट कपडे घातल्यावर हा काळेपणा दिसून येतो. याचा परिणाम थेट तुमच्या लुक वर होतो.म्हणून  आज आपण जाणून घेणार आहोत कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय ह्या उपायांच्या मदतीने आपण आपल्या कोपरांना आणखी सुंदर बनवू शकता.

कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिसळून घ्या. त्यानंतर 10 मिनिटे तसेच राहूद्या. नंतर हि पेस्ट आपल्या कोपरावर हाताने लावा. 15 मिनिटे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला कोपर चोळून धुऊन टाका. आठवड्यातून तीन ते चार वेळा वापरल्यास चांगले परिणाम मिळतात.

कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी एका लिंबाचा रस वाटीमध्ये घ्या. कापसाच्या मदतीने हा रस आपल्या काळवंडलेल्या कोपरावर लावा.

15 मिनिटांसाठी लिंबाचा रस कोपरांवर सुकून द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला कोपर चोळून धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करा.

कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये 1 चमचा साखर मिसळा आणि थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा, हि पेस्ट आपल्या कोपरावर 5 मिनिटे चोळा, त्यानंतर ते 15 मिनिटे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने कोपर धुऊन घ्या. आपल्याला फरक दिसेल.

कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी चमचाभर बेकिंग सोडा आणि थोडासा लिंबाचा रस एकत्र करून घ्या.

चांगली पेस्ट तयार झाल्यावर ह्या पेस्टने आपल्या कोपरांवर 20 मिनिटांपर्यंत मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्याने कोपर धुऊन घ्या. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करावा.

कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण कोरफड गराचा उपयोग करू शकता. यासाठी थोडासा कोरफड गर हातावर घेऊन आपल्या कोपरांवर लावा. साधारणपणे 15 मिनिटे राहूद्या त्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. नियमित असे केल्याने आपल्याला फरक दिसेल.

आपल्याला कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन इंग्रजी लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *