- आरोग्य

विड्याच्या पानाचे फायदे

विड्याच्या पानाचे भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. आजही प्रत्येक पूजेमध्ये, सणावाराला विड्याच्या पानाचा वापर हा शुभ मानला जातो.

पूर्वी पानाचा वापर हा फक्त विडा म्हणून नाहीतर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठी ही केला जायचा. खायच्या पानामध्ये बाष्पशील तेलांसोबतच अमिनो असिड, कार्बोहायड्रेट आणि अनेक प्रकारची व्हिटामिन हि असतात.

पान फक्त आपल्या तोंडाची चवच वाढवत असं नाहीतर याचे अनेक आरोग्यदायी फायदे ही आहेत. चला तर जाणून घेऊयात

आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत असल्यास आपण एक ते दोन विड्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, आणि तो रस कपाळावर लावा. काही मिनिटांतच आपली डोकेदुखी दूर होईल.

विड्याचे पान हे चांगले माऊथ फ्रेशनर मानलं जात. कारण या पानांमधील घटक आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करतात. आपल्या अंगाला खाज येत असेल तर विड्याचे पान पाण्यात उकळून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने अंगाला येणारी खाज बंद होण्यास मदत मिळते.

विड्याच्या पानामध्ये अँटी डायबिटीक गुण असतात. विड्याचे पान खाल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. विड्याच्या पानाचा रस जखमेवर लावला आणि त्यावर पट्टी बांधून ठेवली तर जखम लवकर भरून येते.

विड्याचे पान हे सर्दी खोकला आणि कफ यावर सुद्धा खूप गुणकारी आहे. सर्दी झाल्यावर विड्याच्या पानाला थोडेसे मध लावून खाल्याने सर्दी कमी होईल. तोंड आल्यावर विड्याची पान पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या करा असे केल्याने त्रास कमी होईल.

आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर आपण दोन ते तीन विड्याची पाने  मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, त्यामध्ये दोन ग्लास पाणी मिसळून चांगले आटेपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर ते आपल्या चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर धुऊन टाका असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीशे होतील.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: इंडियन एक्सप्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *