- आरोग्य

घरातील झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय

घरात असणा-या वस्तु जसे की पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॅानिक उपकरणं, वायर अश्या ब-याच वस्तुंना झुरळं हानी पोहोचवतात. ब-याच वेळा, आपल्याला शिजवलेल्या भाज्या, पीठ इत्यादी गोष्टी फेकून द्याव्या लागतात.

घरात जेव्हां झुरळ मोठया प्रमाणात असतात तेव्हा घरात एकप्रकारचा उग्र वास देखील येतो. अन्नात झुरळ पडले आणि अनवधानाने तसे अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्यासाठी देखील हे धो’का’दा’य’क ठरू शकते.

झुरळामुळे घरातही आजार पसरण्याची भीती असते. आज आम्ही तुमच्यासाठी काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही झुरळांना घराबाहेर पळवुन लावू शकता .

ब-याचदा कोंदट आणि अडगळीच्या ठिकाणी झुरळ वावर जास्त असतो. यासाठी घरामध्ये स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोठेही घाण होऊ  देऊ नका.

एका भांड्यात समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिसळा. त्यानंतर त्यात पाणी घाला. आता हे मिश्रण झुरळ असलेल्या ठिकाणी शिंपडा. साखरेचा गोडपणा झुरळांना आकर्षित करेल आणि बेकिंग पावडर झुरळांना घराबाहेर पळवुन लावू शकते.

लवंग आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचा वास झुरळांना घराबाहेर पळवुन लावन्यासाठी उपयुक्त आहे. झुरळ जिथे आहेत त्या ठिकाणी ठेव.

आपल्या कपाटातही झुरळे असल्यास, आपण तेथे लवंग ठेवू शकता. घरात झुरळ त्रास देत असतील तर किचन आणि  घराच्या कोपर्यातत बोरिक पावडर टाका. झुरळ पुन्हा घरात येणार नाहीत.

स्वयंपाकघरात येणाऱ्या झुरळाना घालवण्यासाठी आणखी एक सोपा उपाय आपण करू शकता यासाठी 1 लिटर गरम पाण्यात 2 ते 3 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे बेकिंग सोडा मिसळा, नीट ढवळून घ्या आणि ज्या ठीकाणातून  झुरळ बाहेर येतात त्यावर स्प्रे करा. असे केल्याने झुरळांची वाढ थांबते. आणि झुरळ नाहीशी होतात.

झुरळे घालवण्यासाठी पुदीन्याचे तेल एक सोपा उपाय आहे. याकरता पुदीना तेल हे नैसर्गिक कीटकनाशक आहे, यासाठी पुदीना तेल आणि पाण्याचे मिश्रण असलेला एक स्प्रे बनवू शकता. आपल्या घरात ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी हा स्प्रे मारा.

केरोसीनला खूप गंध असतो. म्हणून आपण झुरळ जिथे आहेत त्या ठिकाणी केरोसीन शिंपडू शकता. कडुनिंब तेल किंवा पावडरच्या साहाय्याने तुम्ही झुरळांना घराबाहेर पळवुन लावू शकता.

कडुनिंबाचे तेल वा पावडर किटकांना नियंत्रीत करण्याचा एक चांगला पर्याय आहे. 1 चमचा कडुनिंबाचे तेल स्प्रे बाटलीमध्ये टाका आणि त्यात पाणी भरा रात्री झोपायच्या अगोदर झुरळ असलेल्या ठिकाणी हा स्प्रे मारा,

घराच्या आजूबाजूला सांडपाणी वाहत नसेल, घरातील स्वयंपाकघर स्वच्छ व कोरडे असेल तर झुरळे येणार नाहीत. झुरळ आणि साबण यांचा ३६ चा आकडा असतो.

साबणाचे पाणी झुरळाच्या अंगावर पडताच ते तडफडू लागते व थोड्या वेळात ते घराबाहेर पळून जाईल. साबण अल्कधर्मी असल्यामुळे ते झुरळासाठी घातक असते.

रात्री स्वयंपाकघर आवरताना जमिनीवर किंवा स्वयंपाकाच्या ओटय़ावर आणि गॅसच्या शेगडीवर कोणतेही खाद्यपदार्थ सांडू देऊ नका. या बरोबरच खरकटी भांडी रात्री कधीही तशीच ठेवू नयेत. त्यातील खरकटय़ाकडे झुरळे लगेच आकर्षित होतात

आपल्याला घरातील झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: टाईम्स ऑफ इंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *