- आरोग्य

थायरॉईड विकार कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आजकाल आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाव लागत आहे. थायरॉईड हा त्यापैकीच एक आजार आहे.

थायरॉईड हे मानेच्या खालच्या बाजूला दिसायला फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असतात, ज्या आपली चयापचय गती नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करण्याचे कार्य करत असतात.

आहारात आयोडीनचा अभाव, काही औषधे आपल्या शरीरात हार्मोन्सच प्रमाण वाढवत असतात. अशी औषधे आपण घेत असाल तर, ताणतणाव, अनुवांशिकता, कधी हि काही खाण्याची सवय या अशा गोष्टींमुळे मुख्यत थायरॉईड हा आजार होऊ शकतो.

थायरॉईड हा आजार झाल्यावर आपल्या शरीरात पुढील बदल होऊ शकतात. थायरॉईड हा आजार झाल्यावर पचनशक्ती मंदावते त्यामुळे वजन वाढायला लागत, केस गळायला लागतात. आपल्या मानेला सूज येते.

बऱ्याचदा घश्यात जळजळ होऊ लागते. आपली चीडचीड होऊ लागते, स्त्रियांमध्ये मा’सि’क पा’ळी अनियमीत होते. प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे आपण सारखे आजारी पडू लागता.

आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करून आपण नक्कीच या आजाराची तीव्रता कमी करू शकता म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. थायरॉईड विकार कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

सर्वप्रथम आपल्याला आहारातून जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळायचे आहे. थायरॉईड विकार लवकर बरे करण्यासाठी आपल्या आहारात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असलेल्या पदार्थांचे सेवन करा.

थायरॉईड विकार लवकर बरे करण्यासाठी आपल्या आहारात तिळ, वाटाणे, अंडी,मासे, गाजर अशा गोष्टींचा समावेश करा यामध्ये असणारे पोषक घटक थायरॉईड नियंत्रणात आणण्यास मदत करतात.

थायरॉईड विकार असल्यास आपण तेलकट, मसालेदार, कॉफी, अतिगोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे साखरेमुळे थायरॉईडचा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो साखर असलेले पदार्थ खाऊ नका.

आपल्या पूर्वजांपेक्षा आपले जीवन अधिक सुख सोयींयुक्त आहे यामुळे आपण जास्त आळशी बनत चालोय. आणि म्हणूनच आपल्याला आरोग्याच्या खूप समस्या होत असतात.

थायरॉईड विकारामधून लवकर बाहेर येण्यासाठी आपल्याला नियमित शारीरिक मेहनत करायची सवय लावावी लागेल. आपण रोज सकाळी अर्धा तास चालायला जाऊ शकता, व्यायाम करू शकता, योगा करू शकता, पोहायला जाऊ शकता.

डान्स करू शकता, यापैकी काही आपल्याला शक्य होत नसेल तर आपण जिना चढू उतरू शकता. जेणेकरून आपण जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकाल आणि थायरॉईड विकारामधून लवकर बाहेर येऊ शकाल.

थायरॉईड विकार असल्यास आपण शक्य तितक्या हळू हळू जेवण करा. जेणेकरून आपण जे खाताय त्या जेवणामुळे अधिक समाधान आपल्याला मिळेल. थायरॉईड ग्रंथी चयापचयसाठी जबाबदार असल्याने, हळू हळू खाल्याने चयापचय प्रक्रिया वाढविण्यात मदत मिळेल.

आपल्याला थायरॉईड विकार कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकल रिव्यू करण्यात आलेला हेअल्थलाईन आणि फार्म इजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *