- आरोग्य

पोटाचा घेर कमी करण्यासाठी दुसऱ्या आठवड्याचा डायट प्लान

जेव्हा आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज असलेला आहार घेतो. तेव्हा वजन वाढते. हे अतिरिक्त वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात योग्य तो बदल करणे गरजेचे असते.

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारातील तेलकट, मैदायुक्त पदार्थ, तसेच पुरेशे फायबर नसलेले पदार्थ खाणे थांबवावे लागेल. आज आपण जाणून घेणार आहोत वजन कमी करण्यासाठी आदर्श डायट प्लान

वजन कमी करण्यासाठी सर्वसामान्य काम करणाऱ्या माणसाला साधारणपणे 1600 कॅलरीज पर्यंत आहार घेऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी कष्टाचे काम करणाऱ्या माणसाला साधारणपणे 2400 कॅलरीज पर्यंत आहार घेऊ शकतात.

मागच्या आठवड्यात डायट प्लाननुसार आपण आपल्या आहारात बदल केला असेल तर आपल्याला पूर्वीपेक्षा स्वस्थ आणि चपळ वाटत असेल. आता ह्या आठवड्यात आपण आहाराबरोबर काही सोपे व्यायाम करायला सुरुवात करा.

जसे कि जिना चढणे, सकाळी अर्धा तास चालणे, सायकल चालवणे, सकाळी योगा करणे. ह्या गोष्टी सुरु करा. आपल्याला शक्य होईल तितके पण नियमित ह्या गोष्टी करा. ह्या आठवड्यात आपला डायट प्लान असा असेल

सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास मेथीचे दाणे असलेले पाणी प्या. मेथीचे पाणी प्यायल्याने चयापचय (पाचन शक्ती) सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत मिळते. (वेळ साधारणपणे 6.30 ते 7.30)

सकाळच्या नाश्त्यामध्ये एक प्लेट पोहे, उकडलेले अंडे (पिवळा बलक काढून) अथवा इडली खा. शक्य असल्यास सोबत 4 ते 5 बदाम हि खाऊ शकता.

आपल्याला चहा प्यायची सवय असेल तर दिवसभरात फक्त 2 कप चहा आपण घेऊ शकता. शक्य असेल तर ग्रीन टी प्या. (वेळ साधारणपणे 7.30 ते 8.30) साधारणपणे 10.00 वाजता एक ग्लास दुध किंवा 1 ग्लास फळांचा रस प्या.

दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी घरात बनवलेली कोणतीही भाजी चपाती असल्यास 3 चपात्या आणि भाकरी असल्यास एक भाकरी एक वाटी कोशिंबीर आणि जेवणाच्या दहा ते पंधरा मिनिटांनंतर एक वाटी ताक प्या. तरीही भूक असेल तर आपण एक काकडी खाऊ शकता. (वेळ साधारणपणे दुपारी 12:30 ते दुपारी 1:00)

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये एक वाटी मोड आलेले कडधान्य अथवा एक छोटी प्लेट भरून काकडी, कलिंगड, खरबूज, गाजर, बीट, मुळा अशा गोष्टी खाऊ शकता. त्या सोबत 1 ग्लास नारळ पाणी प्या.

नारळ पाण्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि इतर पोषक घटक असतात.  नारळ पाण्यामध्ये असणारे इलेक्ट्रोलाइट्स शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे कार्य करतात.

रात्रीच्या जेवणात एक वाटी वाफवलेल्या पालेभाज्या, (एक वाटी चिकन करी) दीड भाकरी एक वाटी कोशिंबीर आणि सलाड यांचा समावेश करा.

दिवसभरात वरती सांगितले आहे त्या प्रमाणात आपण आहार घेतला तर आपल्याला साधारणपणे 1500 कॅलरीज आपल्याला त्यातून भेटतील.

खाण्यापूर्वी भाज्या आणि फळे चांगले धुण्यास विसरू नका. डायट प्लान संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण ते कमेंट मध्ये सांगा.

आपल्याला पोटाचा घेर कमी करण्यासाठी डायट प्लान हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *