- आरोग्य

फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जगातील सगळ्यात मोठ्या फळाचा मान “फणस” या फळाला मिळालेला आहे. फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणसामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, कॅल्शिणयम, पोटॉशियम, आयरन, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम असे शरीराला आवश्यक आणि पोषक घटक असतात.

आज आपण जाणून घेणार आहोत फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे. फणसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

फणसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. मात्र कॅलरीज खूप कमी असतात.फणसामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असत. फणसाचे सेवन केल्याने आपल्याला बराच वेळ भूक देखील लागत नाही. वजन कमी करण्यासाठी ह्या सूपरफुडचा समावेश आपण आपल्या डायट प्लान मध्ये अवश्य समावेश करा.

पिकलेले फणस खाल्याने पोट साफ होण्यास मदत होते. आपल्याला असलेल्या अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. वाढत्या वयाच्या मुलांनी फणसाचे सेवन केल्याने शारीरिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत मिळते.

फणसामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याने आपल्याला अनिमिया हा आजार असल्यास आपण फणसाचे सेवन करू शकता. फणसात व्हिटामिन ए असल्यामुळे फणस खाल्याने डोळ्यांच्या आरोग्यास फायदा होतो. आणि त्वचा मऊ चमकदार होते.

फणसाच्या सालीपासून निघणारे दूध शरीराच्या सुजलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो. फणसाचे सेवन केल्याने गुडघ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतात.

आपल्याला फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेअल्थलाईन आणि हेल्थीफाय इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *