- आरोग्य

चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स येत असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स गेले  तरीही त्याचे डाग आणि खड्डे आपल्या चेहऱ्यावर तसेच राहतात यामुळे आपला चेहरा खराब आणि निस्तेज दिसू  लागतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी थोडीशी मुलतानी माती घ्या त्यामध्ये समप्रमाणात  लिंबाचा रस, गुलाबपाणी मिसळा अन हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. अर्धा तास तसेच राहूद्या नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे कमी होतील.

चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफडाचा गर  लावा. अन सकाळी झोपेतून उठल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाका असे केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे नाहीसे होतील.

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कडूलिंबाची काही पानाची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा.

10 – 15 मिनिट हा लेप चेहऱ्यावर सुकून द्या त्या नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील. त्याबरोबरच मुरूम हि येण्याचे प्रमाण कमी होईल.

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कच्च्या बटाटयाची पेस्ट करून घ्या. आपल्या चेहऱ्यावर लावा. 10 मिनिट तसेच चेहऱ्यावर सुकून द्या त्या नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील. आणि आपला चेहरा ग्लो करू लागेल.

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी संत्र्याची साल सुकवून घ्या. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून थोड्याश्या दुधामध्ये मिसळून पेस्ट तयार करा. हि पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा.

त्यानंतर चेहऱ्यावरील डाग असलेल्या भागावर हाताने चोळा. 20 मिनिट तसेच चेहऱ्यावर सुकून द्या त्या नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी हा उपाय आपण आठवड्यातून तीन वेळा करा

लक्षात ठेवा चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास फोडू नका. पिंपल्स फोडल्यास बऱ्याच वेळा त्याचे डाग पडतात. चेहरा चांगला टवटवीत दिसावा म्हणून आपल्या आहारात फळ, हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करा. तेलकट, मसालेदार पदार्थ आहारातून कमी करा.

दिवसभरात कमीत कमी 2 / 3 लिटर पाणी प्या. पाणी आपल्या त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. जेणेकरून आपला चेहरा ताजा तवाना दिसतो.

आपल्याला चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: फेमिना इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *