- आरोग्य

तोंडाला दुर्गंधी येत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

श्वासांच्या दुर्गंधी ची अनेक कारणे असू शकतात. पचन क्रियेत बिघाड झाल्याने, दात कुजल्याने, पोटात काही गडबड झाल्याने, कांदा, लसूण, मसालेयुक्त पदार्थ खाल्याने, दात स्वच्छ न ठेवन्यामुळे, अन्नाचे कण दात तसेच हिरड्यांमध्ये साचून राहिल्यामुळे, किडलेल्या दातांमुळे, श्वसनमार्गातील काही संसर्गामुळे तोंडाला किंवा श्वासात दुर्गंधी येते.

बऱ्याच  वेळा बोलताना स्वतःलाच जाणवते व काही वेळा मुखदुर्गंधी दुसऱ्यांही  जाणवते.  म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठीचे घरगुती उपाय.

जेवण झाल्यानंतर चमचाभर बडीशेप खाल्ल्याने तोंडाला दुर्गंध येत नाही. याबरोबरच पचन क्रिया सुधारते. बडीशेप भाजून घेऊन खाल्याने लवकर फरक पडतो. यामुळे जेवणाचे पचन होते, त्याचबरोबर श्वासांची दुर्गंध घालविण्यात मदत मिळते.

एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळीच भरल्यास तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. एक चमचा आल्याचा एक गरम पाण्यात टाकून त्याने सर्व भरल्यास तोंडाचा घाण वास जातो.

तोंडाला दुर्गंधी येत असल्यास जेवणानंतर थोडेसे धणे चावून खा. असे केल्याने तोंडाला येणारा वास कमी होईल. तुळशीची चार पाणी रोज खाऊन वरून पाणी पिल्याने तोंडाचा वास जातो.

तुळशीची पाने आरोग्याला हितकारक असतात. जर रोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते. जेवणानंतर एक लवंग खाल्याने तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच जिरे भाजून खाल्ल्याने हे तोंडाचा वास नाहीसा होतो.

भरपूर पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते. पाण्यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कणही निघून जातात. सकाळी उठल्याबरोबर विशेष करून जास्त पाणी प्यावे. शक्यतो चूळ भरूनच तोंड धुवा नाहीतर खाल्लेले अन्नकण दातांमध्ये अडकून मुखदुर्गंधी उत्पन्न करतात.

तसेच कच्चा कांदा, लसूण यांच्या सेवनाने मुखदुर्गंधी अधिकच वाढते. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाण्याने चूळ भरून तोंड साफ करावे. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास अननस ज्यूस प्यायल्याने तसेच अननस कापून खाल्याने तोंडाला येणारा वास कमी होईल.

चहा, कॉफी यांचे सर्रास सेवन जे आपल्या समाजात होत आहे त्याचा कुठेतरी अतिरेक आता टाळावा. तंबाखू सेवन, मद्यपान या व्यसनांपासून मुक्त व्हावे. ग्रीन-टी चा वापर करा.

यामध्ये असणार्या, प्रतिजैविक घटकांमुळे दुर्गंधीवर नियंत्रण ठेवता येते. तोंडातील व्रणांमुळे मुखदुर्गंधी असल्यास पेरूची कोवळी पाने चावून खाल्ल्याने दूर होते. तसेच जेवण झाल्याने रोज दोन पुदिन्याची पाने खाल्याने ही दुर्गंधी गायब होते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *