- इन्फोमराठी

बाथरूमच्या नळावरील क्षारांचे डाग घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

आजकाल बोअरवेलच्या पाण्याचा वाढत्या वापरामुळे आपल्या घरातील पाण्याच्या नळावर पांढरा थर जमा झाल्याचे आपण बघितले असेल बऱ्याचदा आपल्या मनात विचार हि आला असेल कि हा थर कशामुळे जमा होतो.

आणि हे साफ कशाने करता येऊ शकत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. बाथरूमच्या नळावरील क्षारांचे डाग घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पाण्याच्या नळावर जमा होणारा हा थर पाण्यातील क्षार आणि पाण्यातील कॅल्शियम या घटकामुळे जमा होत असतो. जर पाण्यामध्ये जास्त प्रमाणात असे घटक असतील तर त्यामुळे केस कोरडे पडतात, केस गळू लागतात, केसांमध्ये कोंडा होऊ लागतो, त्वचा रोग होऊ शकतात.

तसेच असे पाणी प्यायल्याने दातांवर डाग पडू शकतात. मुतखडयाचा त्रास होऊ शकतो, कपडे धुण्यासाठी असे पाणी वापरले तर त्यामुळे कपडे लवकर खराब होऊ शकतात.

बहुतेक बाथरूममध्ये स्टीलचे नळ असतात त्यावरील डाग घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. यासाठी एक कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

त्यानंतर त्याचा रस गाळणीने वेगळा करून त्यामध्ये 2 ते 3 चमचे व्हाईट व्हिनेगर मिसळून कपड्यावर हे मिश्रण घ्या आपल्या हातात रबराचे हातमोजे घाला.

त्यानंतर हे मिश्रण आपल्या बाथरूमच्या नळावर लावा. 2 मिनिट राहूद्या त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आपल्याला लगेच फरक दिसून येईल.

स्टीलच्या नळावरील पाण्याचे डाग घालवण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर करू शकता यासाठी आपण सर्वप्रथम एक लिंबू कापून त्याचा रस काढा. सुती कपड्यावर तो रस घेऊन नळावर गुंडाळून ठेवा 15 मिनिटांनी नळ धुऊन टाका. आपल्याला फरक दिसून येईल.

स्टीलच्या नळावरील पाण्याचे डाग घालवण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा हि वापर करू शकता यासाठी थोडासा बेकिंग सोडा एका वाटीत घ्या त्याध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा.

हि पेस्ट ब्रशच्या सहाय्याने बाथरूमच्या नळावर लावा. ब्रशने थोडेसे घासा. नंतर पाण्याने धुऊन टाका. आपले बाथरूमच्या नळ स्वच्छ दिसू लागेल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *