- आरोग्य

चेहऱ्यावर असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी घरगुती उपाय

काही स्त्रियांच्या ओठांच्यावर आणि हनुवटीवर लव असते. शरीरातील  हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ओठांवर केस येत असतात. चेहऱ्यावर अनावश्यक केस असल्यास त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते.

चेहऱ्यावरील हे अनावश्यक केस काढण्यास दरवेळी पार्लरला जाणे परवडत नाही. म्हणूनच आज आपण चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी असलेल्या घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालविण्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस घ्या, त्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करा.

हे मिश्रण गरम करून गार झाल्यावर चेहऱ्यावर ज्याठिकाणी अनावश्यक केस आहेत तेथे लावा. काही वेळानंतर मऊ कापडाच्या सहाय्याने पुसून घ्या. जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस केलात तर अनावश्यक केस निघून जातील.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी दुसरा घरगुती उपाय म्हणजे केळी आणि ओट्सपासून बनवलेला स्क्रब. यासाठी एक पिकेलेलं केळ घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमचे ओट्स घाला.

केळी मॅश करून घ्या. याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर कमीत कमी 15 ते 20 मिनिटे तशीच ठेवा. हा उपाय केल्याने अनावश्यक केस निघून जातील.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करुन त्यामध्ये दुध मिसळा. हे मिश्रण आपल्या ओठांच्यावर लावा सुकल्यावर 15 मिनिटांनी हाताने चोळून काढा. असे केल्याने अनावश्यक केस काढून टाकण्यास मदत मिळते.

आपल्याला चेहऱ्यावर असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू केलेला हेअल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *