- आरोग्य

आवळ्याचा रस पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कार्बोहाइड्रेट फायबर यासारखे शरीराला आवश्यक घटक असतात. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग या बहुगुणी आवळ्याचा रस पिण्याचे फायदे जाणून घेऊयात.

आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्याने दृष्टीदोष कमी होण्यास मदत मिळते. नियमीत आवळ्याचा रस प्यायल्याने डोकं शांत राहत चिडचिड होत नाही.

आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. नियमीत आवळ्याचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात. आवळ्याचा रस प्यायल्याने केसांच्या केसांची वाढ खुंटणे, केस गळणे, केस रुक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा समस्या कमी होतात. केस मजबूत, चमकदार होतात.

आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

आवळ्याचा रस शरीरातील मेंटबॉलिज्म मजबूत करतो सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत आवळ्याचा रस प्यायल्यानेवजन कमी होण्यास मदत मिळते. आवळ्याचा रस आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करतो आणि त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यास मदत मिळते.

आवळ्याचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. नियमीत आवळ्याचा रस प्यायल्याने दात चमकदार होतात. आवळ्याचा रस लघवी साफ न होणे, पोट साफ न होणे अशा आजारावर अत्यंत गुणकारी आहे.

आवळ्याचा रस रोज सकाळी घेतल्यास दिक्सभर ताजेतवाने वाटते व पित्ताचे विकार दूर होऊन पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोग कमी होण्यास मदत मिळते.

नियमीत आवळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरास रोगाविरूद्ध लढायला मदत मिळते. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. आवळ्याचा रस प्यायल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढण्यास मदत मिळते.

आपल्याला आवळ्याचा रस पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *