- आरोग्य

पाठदुखीवरील प्रभावी घरगुती उपाय

आपल्या शरीराला आधार देण्याचे कार्य पाठीचा कणा करत असतो. आजकाल पाठदुखीची समस्या अगदी सर्वसामान्य झाली आहे. याचे कारण म्हणजे आपल्या आहारात पुरेश्या प्रमाणात कॅल्शियमयुक्त आहार न घेणे, बराच वेळ एका जागी बसून कॉम्पुटरवर काम करण्याची सवय, बैठे काम, विश्रांती न घेता सलग वाहन चालवल्याने पाठ आणि कमरेवर प्रचंड ताण येतो.

यामुळे तीव्र कंबर दुखीचा त्रास होऊ शकतो. जेव्हा पाठदुखी सुरु होते तेव्हा उठणे, बसणे आणि झोपणे यात खूप अडचण येते आणि कधीकधी ही वेदना इतकी तीव्र असतात की अगदी उभे राहण सुद्धा कठीण होऊन जात.

म्हणूनच आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. पाठदुखीवर प्रभावी घरगुती उपाय हे उपाय केल्याने आपली पाठदुखी नाहीशी होईल आणि वेदनापासून आराम मिळेल.

पाठदुखीचा त्रास झाल्यास कोमट तेलाने मालिश करा. यासाठी मोहरीचे तेल गरम करून थोडे थंड होऊन द्या. नंतर ह्या तेलाने हलक्या हातानी आपल्या पाठीची मालिश करा. असे दिवसातून दोनदा करा. दररोज या तेलाने मालिश केल्यास वेदना दूर होईल.

पाठ दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकुन या पाण्याने आंघोळ करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. पाठ दुखीपासून आराम मिळतो.

पाठ दुखत असल्यास तुळशीची पाने मधासोबत खाल्ल्याने पाठदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.  तुळशीच्या तेलाने कंबरेला मालिश करणे देखील फायदेशीर आहे.

पाठ दुखीसाठी आहार देखील महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या आहारात साजूक तूप, दूध, दही, डिंक, उडीद अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.

चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हि कंबरेवर त्याचा वाईट परिणाम होतो. शक्यतो डाव्या कुशीवर किंवा पाठीवर झोपा. तसेच, चांगल्या आरामदायी गादी आणि आरामदायक उशा वापरा.

नियमित व्यायाम केल्याने आपली पाठदुखीची समस्या कमी होईल. आपल्याला नियमित पाठदुखीचा त्रास असल्यास अवजड वस्तू उचलणे टाळा. कारण असे केल्याने स्नायू ताणतात आणि वेदना सुरु होतात.

जास्त ठिकाणी एकाच ठिकाणी बसून राहू नका. कार्यालयात काम करत असताना दर 20 मिनिटांनी आपल्या खुर्चीवरुन उठून फिरा. असे केल्याने कमरेवर दबाव येत नाही. शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. अति वजन वाढल्याने हि पाठीवर ताण येत असतो.

आपल्याला पाठदुखीवरील प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू केलेला हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *