- आरोग्य

चेहरा उजळ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

चेहरा हा आपल्या सौंदर्याचा सगळ्यात महत्वाचा घटक असतो. वाढत्या प्रदूषण आणि धुळीमुळे बऱ्याचदा आपला चेहरा काळपट दिसू लागतो. चेहऱ्याची त्वचा हि नाजूक असते.

काळवंडलेली त्वचा पुर्वव्रत करण्यासाठी बऱ्याचदा केमिकल प्रोडक्टचा वापर केल्याने आपला चेहरा खराब होऊ शकतो. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनीही काळवंडलेली त्वचा पूर्वीसारखी होण्यास मदत होते. म्हणूनच आज जाणून घेऊयात चेहरा उजळ करण्यासाठी काही घरगुती उपाय.

तुम्हाला घरच्या घरी चेहरा उजळ करायचा असेल तर तुम्ही बारीक केलेले दोन बदाम, तीन चमचे दुधात घाला. त्यामध्ये एक चमचा वाळलेल्या संत्राची साल बारीक करून त्याची पूड घाला. हे मिश्रण 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवा. तुम्हाला तुमचा चेहरा उजळलेला दिसेल.

झटपट चेहऱ्यावर उजळपणा आणायचा असेल तर दोन ते तीन चमचे साखर घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून हलक्या हाताने चेहऱ्याची मालिश करा. तुमच्या चेहऱ्यात साचलेली घाण निघून जाईल. काही वेळात चेहरा स्वच्छ धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी 1 बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हि पेस्ट लावल्याने चेहऱ्यावरील त्वचा गोरी होते आणि डागापासूनदेखील सुटका होण्यास मदत मिळेल.

चंदन हे चेहरा उजळ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. चंदन पावडर घेऊन त्यात एक चमचा कोवळे दूध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर काही काळ लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा धुवा. चेहरा ग्लो करेल.

चेहरा उजळ करण्यासाठी 2 चमचे हळद पावडर घ्या त्यामध्ये 2 चमचे बेसन आणि थोडेसे  पाणी किंवा दूध घालून पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच सुकू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने हलक्या हाताने स्क्रब करत चेहरा धुऊन घ्या.

चेहरा उजळ करण्यासाठी पपईचे काप कापून चेहऱ्यावर लावा. पपईत असलेले गुणधर्म नैसर्गिकरित्या चेहरा क्लिन करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे चेहरा उजळ करण्यासाठी तुम्ही पपईचा वापर करू शकता.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि मेडिकली रिव्यू करण्यात आलेल्या फार्मइजी इंग्रजी ब्लॉग चा संदर्भ घेऊन देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *