- आरोग्य

मधुमेह आजाराची लक्षणे

मधुमेह आजाराच्या रुग्णामध्ये संपूर्ण जगात आपल्या देशाचा क्रमांक हा खूप वरती लागतो. आपल्या देशात मधुमेह हा सर्वसामान्य आजार झाल्याचे आपल्याला दिसते. या मागे खरतर आपली जीवनशैली कारणीभूत आहे. आपल्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे म्हणजेच मधुमेह.

आपण जे अन्न खातो, त्याच्या शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी ग्लुकोजमध्ये  रूपांतर होते. मधुमेह आजारामध्ये याचेच असंतुलन होते, आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. आज आपण जाणून घेणार आहोत. मधुमेह आजाराची लक्षणे.

मधुमेह आजाराच्या सुरुवातीला आपल्याला सारखी सारखी तहान लागते. जास्तीत जास्त पाणी प्यावे वाटते. कितीही पाणी प्यायले तरी तहान जात नाही. वारंवार लघवीला लागते.

मधुमेह आजाराच्या सुरुवातीला अचानकपणे वजन वाढू लागते. तसेच वजन कमी हि होऊ लागते. मधुमेह आजाराच्या सुरुवातीला अचानक अंधारी येणे, चक्कर येणे अशा गोष्टी होऊ शकतात.

मधुमेह आजाराच्या सुरुवातीला शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचे रूग्ण अधिक चिडचिडे बनतात. मधुमेह आजाराच्या सुरुवातीला घराबाहेर पडण्याची ईच्छा होत नाही. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही.

मधुमेह आजारामध्ये शरीरावर झालेल्या आपल्या शरीरातील लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात. त्या ग्लुकोजची प्रमाणात वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत.

त्यामुळे जखमा लवकर भरून येत नाही. जखम चिघळत राहतात. जखमेला खाज येते. हे ही मधुमेहाचे लक्षण आहे. मधुमेह आजाराच्या सुरुवातीला हाता पायाला सतत मुंग्या येतात. म्हणजेच हात पाय बधीर होतात. हे ही मधुमेहाचे लक्षण आहे.

वरती दिलेल्या माहितीमधील लक्षण आपल्याला दिसून आली तरी, लगेच आपल्याला मधुमेह झाला आहे. असे समजून घाबरून जाऊ नका. हि माहिती आपण जागरूक व्हावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून दिलेली आहे. आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *