- आरोग्य

तरुण वयात आपले केस पांढरे होण्यापासून वाचवायचे असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

शरीरामध्ये लोह, विटामिन बी 12 या पोषक तत्वांची कमतरता असल्यास प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन  घेतल्याने केस लवकर पांढरे होऊ शकतात. काळ्या केसांना सौंदर्याचा भाग म्हटल जात. केसांना काळं करण्यासाठी बऱ्याचदा डायचा वापर केला जातो.

या डायमध्ये केमिकल असतात ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा डाय केल्याने केस कोरडे होतात किंवा केस गळणे सुरु होऊ शकते. जर आपले केस अकाली पांढरे होत असतील तर आपण या काही घरगुती उपायांची मदत घेऊन आपले केस काळे ठेऊ शकता.

केस पांढरे होऊ लागतात. केस लांब, आणि दाट होण्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा जर आपण जास्त पाणी प्यायले तर त्याचा केसांवर खूप सकारात्मक परिणाम होईल. पाणी केवळ केसांना हायड्रेटेड ठेवत नाही तर त्वचेसाठी फायदेशीर देखील असते.

आवळा तेल किंवा बदाम तेल आपल्या केसांना लावून मालिश करा. असे केल्याने आपले केस काळे राहतील. केसांना स्ट्रेटनींग केल्याने केसांचा नैसर्गिक काळा रंग जाऊ शकतो. आणि आपले केस पांढरे दिसू लागतात. त्यामुळे आपल्या केसांना स्ट्रेटनींग करायचे असल्यास अत्यंत गरजेचे असल्यासच करा.

केस काळे राहण्यासाठी एका वाटीमध्ये खोबऱ्याचे  तेल घ्या त्यामध्ये मुठभर कढीपत्याची पाने घालून गरम करून घ्या. पानाचा रंग बदलल्यावर खाली उतरवा.

हे तेल थंड होऊ द्या. या तेलाने आठवड्यातून २ वेळा केसांच्या मुळावर हे तेल लावून मालिश करा. आपल्याला फरक दिसेल. आपले केस काळे राहण्यासाठी आपण आहारात ताजी फळे, भाजीपाला, यांचा समावेश केला पाहिजे. केसांना भृंगराज तेलाने मालिश केल्याने केस काळे राहण्यास मदत मिळते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *