- आरोग्य

कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास कोणते फायदे मिळतात?

आपल्या इथे घराजवळ कडूलिंबाचं झाडं असणं हे शुभ मानलं जातं कारण कडूलिंबाचा अनेक आजारांवर फायदा होतो. कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे.

कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात. आज आपण जाणून घेणार आहोत कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात.

कांजन्या आल्यावर  गरम पाण्यात कडुलिंबाची पाने घालून आंघोळ घातली जाते. कफ, खोकला नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करू शकता. श्वसन विकारांवर कडुलिंब दीर्घकाळापर्यंत आराम देत.

कडुलिंबाचे पानांचा उपयोग तुमच्या शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे मधुमेहाचा त्रास कमी होतो.

कडुलिंबात फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे, तुम्हाला अन्नपदार्थ पचण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तरी कडुलिंब त्यापासून सुटका करून देण्यासाठी मदत करतं.

हातापायाला खूप घाम येत असेल तर कडूलिंबाचं तेल त्यावर लावल्याने घाम येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. शरीराची पाचनक्षमता वाढवण्यासाठी कडुलिंब मदत करतं.

कडुलिंबात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे, चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेडस, पुरळ येणं, तेलकट त्वचा, त्वचा निस्तेज पडणे अशा विविध समस्यांवर कडुलिंबाचा पाला उपयोगी ठरतो.

कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने हिरड्या आणि दात मजबूत होतात. कडुलिंबाच्या फुलांचा काढा करून प्यायल्यास दातांचे आजार दूर होतात.

जर तोंडावर सुरकुत्या येत असतील तर आपण कडुलिंबाची पाने खाल्ले पाहिजे. जर तुम्ही ते खाऊ शकत नसेल तर त्याची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू केलेला हेल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *