आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त वहन करून हृदयाकडे परत घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना व्हेन्स असे म्हणतात. या रक्त वाहिन्यांपैकी पायाच्या व्हेन्स या रक्ताने फुगतात आणि ठळकपणे दिसू लागतात. या अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी म्हणजेच व्हेरिकोज् व्हेन्स होय.
सुरुवातीला या अशुद्ध रक्तवाहिन्याचा त्रास जास्त होत नाही. मात्र कालांतराने संध्याकाळच्या वेळी पाय दुखणे किंवा पायात गोळे येणे अशा गोष्टी होऊ लागतात. बराच वेळ एकाच जागी उभे राहिल्याने व्हेरीकोज व्हेन्स हा आजार होऊ शकतो. आज जाणून घेऊयात व्हेरीकोज व्हेन्स होण्याची कारणे.
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील रक्तवाहिन्याची लवचिकता कमी होऊ लागते. चाळीशीच्या नंतर हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असते.
स्त्रियांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असते एका जागी जास्त वेळ बसून राहिल्याने, घट्ट कपडे वापरल्याने, उंच टाचा असलेले शूज वापरल्याने आपल्याला शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीवर परिणाम होत असतो.
जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने ही व्हेरीकोज व्हेन्स हा आजार होण्याचा धोका असतो. बऱ्याचदा आपल्याला पायावर पाय मुडपून ठेवून बसण्याची सवय असते. जास्त वेळ असे बसल्याने
अति जास्त वजन वाढल्याने हि शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीवर परिणाम होत असतो. शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीवर परिणाम होऊन व्हेरीकोज व्हेन्स हा आजार होण्याचा धोका असतो.
व्हेरीकोज व्हेन्स होऊन द्यायचा नसेल तर आपण या गोष्टी करायचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करा त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहील.
आणि वजन देखील नियंत्रणात राहील. कारण जर वजन प्रमाणापेक्षा जास्त झाले तर पायावर त्याचा दाब येऊन व्हेरीकोज व्हेन्स या समस्येला आपल्याला सामोरे जावे लागेल.
याबरोबरच चालताना पायावर कमी दाब येण्यासाठी कमी हिल्सचे शूज वापरा. व्हेरीकोज व्हेन्स आजारापासून स्वताला वाचवण्यासाठी शक्य तितके चालणे, पोहणे, योगा करणे अशा गोष्टी आपण करू शकता.
आपल्याला व्हेरीकोज व्हेन्स होण्याची कारणे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकल न्यूज टुडे