- आरोग्य

किडनीस्टोन झाला आहे हे कसे ओळखाल?

किडनीस्टोन आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. खाण्यापिण्यातील अनियमितता आणि कमी पाणी पिणे या गोष्टी किडनीस्टोन होऊ शकतो. किडनीस्टोन झाल्यास असह्य वेदना होतात. किडनी आपल्या शरीरात रक्तशुद्धीचे कार्य करीत असतात.

आपण करत असलेल्या जेवणामध्ये कॅल्शियमसारखे क्षार असतात. जे लघवीवाटे बाहेर पाठवण्याचे कार्य आपल्या किडनी करत असतात. क्षारयुक्त पदार्थांचे आहारात प्रमाण अधिक असल्यास आणि आपण कमी पाणी पित असाल तर क्षारांचे प्रमाण वाढल्याने ते मूत्रपिंडात साचून हळूहळू खडे तयार होतात.

यालाच किडनी स्टोन असे म्हणतात. किडनीस्टोन झाल्यास असह्य वेदना होतात. म्हणून हि समस्या होण्याआधी आपल्या शरीरात कोणकोणते बदल दिसतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

किडनीस्टोन होण्याआधी आपल्या शरीरात पुढील लक्षणे दिसू शकतात. आपण थोडेसे काम केले तरी हि जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. लघवी करताना त्रास होऊ शकतो.

लघवीचा रंग लालसर होऊ शकतो, तसेच लघवी करताना लघवी मधून रक्त हि येऊ शकते. किडनी स्टोनचा त्रास असल्यास सतत लघवीला लागल्यासारखे वाटत राहते. लोअर बॅक दुखू लागते.

लघवी अपुरी झाल्याची भावना असणे, लघवीतून पांढरा फेस पडणे, भूक न लागणे, वजन कमी होणे आणि झोप कमी होणे ही सुद्धा किडनीच्या आजारांची लक्षणे आहेत. हातापायावर सूज येणे हे सुद्धा किडनीस्टोन असण्याचे लक्षण आहे.अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *