- आरोग्य

घरातील “चिलट” घालवण्यासाठी घरगुती उपाय

पावसाळयात कचरा, घाण यामुळे चिलटे, माश्या, मच्छर याचा त्रास सर्वाधिक होत असतो. कितीही हाकलून लावलं तरी गुं गुं करत डोळ्यांसमोर येऊन पिंगा घालण्याच काम चिलट करत असतात.

आपले डोळे ओलसर असतात आणि चिलटाना प्र’ज’न’न करण्यासाठी ओलाव्याची गरज असते. म्हणून चिलट डोळ्यांभोवती पिंगा घालत असतात.

चिलट मच्छरांसारखे चावत नसले तरी हि चिलटामुळे नको होऊन जात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत घरातील “चिलट” घालवण्यासाठी घरगुती उपाय.

आपल्या घराच्या आजूबाजूला असणारे डबके, पाणी साठू शकत अश्या जागा, कचरा टाकण्याची जागा यांची सफाई करा. कचऱ्याची विल्हेवाट लावून टाका, डबके बुजवून टाका, इतर ज्या गोष्टींमध्ये पाणी साचू शकत त्या साफ करा. सफाई केल्याने पाणी साचणार नाही.

घरात चिलट होत असतील तर जेवल्यानंतर भांडी लगेच धुऊन टाका. तसेच फरशीसुद्धा जेवण केल्यानंतर पुसून घ्या. भांड्यावर झाकण ठेवत चला. ओला कचरा बंद असणाऱ्या कचरा कुंडीतच टाका.

आपल्या घरात धूप जाळल्याने चिलट कमी होण्यास मदत मिळेल. तसेच आपण कडूलिंबाची पानांचा हि धूर करू शकता. त्यामुळे माश्या, मच्छर, चिलट कमी होतील.

चिलट” घालवण्यासाठी एक भांड्यात पिकलेल्या केळ्याचे काप करून टाका नंतर त्या भांड्याला वरून प्लास्टिक कागद लावा व त्या प्लास्टिकच्या कागदाला सुईने दोन तीन छिद्र पाडा असे केल्याने सर्व चिलट त्या भांड्यात अडकले जातील.नंतर ते फेकून द्या.

चिलट” घालवण्यासाठी एका उंच बाटली पाण्याने अर्धी भरून घ्या. त्यामध्ये थोडासा लिक्वीड सोप टाका. त्यानंतर त्यामध्ये 50 मिली अलपल सायडर व्हीनेगर टाका. अपल सायडर व्हीनेगरच्या गोड-आंबुस वासाने चिलटं आकर्षित होतात आणि बाटलीच्या आत पडतात मग मरतात.

आपल्याला घरातील “चिलट” घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *