- आरोग्य

अपचन, गॅसची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

हल्ली बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य, वेळी अवेळी खाणे, ताणतणाव यामुळे आतड्यात वायू जमा होणे म्हणजेच गॅसची समस्या निर्माण होणे सामान्य झालय.

मसालेदार, तिखट पदार्थ खाल्याने अनेकांना अपचन, गॅसची समस्या होते. म्हणूनच आज आपण अपचन, गॅसची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आज आपण घेणार आहोत.

रिकाम्या पोटी जिरे खाल्याने गॅस होत नाही. तसेच लिंबु पाणी पिणे हा या समस्येवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे ज्यावेळी गॅस होईल तेव्हा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस  मिसळून या पाण्याचे सेवन केल्यास गॅसची समस्या दूर होईल.

अपचन आणि गॅसच्या समस्येसाठी ओवा हलकासा भाजून घ्या. या भाजलेल्या ओव्याची पूड तयार करून या बारीक केलेल्या मिश्रणात काळे मीठ घालून एक ग्लास गरम पाण्यातून पिल्यास ऍसिडिटीची समस्या दूर होईल.

अपचन होऊन पोटात जळजळ होत असेल तर दररोज जेवण झाल्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा चघळावा असे केल्याने जळजळ  होण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

पोटफुगी अथवा गॅसची समस्या उद्भवली असेल तर यावर उपाय म्हणून तुम्ही पुदिना खाऊ शकता. तसेच आल्यामुळे पोटातील अनेक समस्या दूर होतात. आले हा गॅस कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. अपचनाचा जास्तच त्रास होत असेल तर हिंग आणि काळे मीठ पाण्याबरोबर घेतल्याने झटपट आराम मिळतो.

अपचन आणि गॅसची समस्या होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. शक्यतो घरचेच पदार्थ खा. बाहेर जेवणे टाळा याबरोबरच  भूक नसताना आहार घेऊ नका. ऍसिडिटीचा त्रास असल्यास शक्यतो कच्चा कांदा खाणे टाळा.

ऍसिडिटीचा त्रास होऊ नये यासाठी झोपण्याआधी कमीत कमी तीन तास आधी जेवण करा. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार खाण टाळा.

ऍसिडिटीचा त्रास होऊ नये यासाठी उजव्या कुशीवर झोपणे टाळा. आपल्याला अपचन, गॅसची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन इंग्रजी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *